Monday, February 23, 2026

Nepal Accident: नेपाळमध्ये त्रिशुली नदीत बस कोसळून १८ जणांचा मृत्यू

Nepal Accident: नेपाळमध्ये त्रिशुली नदीत बस कोसळून १८ जणांचा मृत्यू

काठमांडू: नेपाळच्या राजधानीपासून सुमारे ९० किमी अंतरावर एक मोठा बस अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी नेपाळच्या धाडिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ एक प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळून किमान १८ जणांचा मृत्यू झाला आणि २६ प्रवासी जखमी झाले. पोखराहून काठमांडूला येणारी बस काठमांडूच्या पश्चिमेला सुमारे ९० किमी अंतरावर पृथ्वी महामार्गावर त्रिशुली नदीत कोसळल्याने हा अपघात झाला.

नेपाळ सशस्त्र पोलिस दलाचे प्रवक्ते बिष्णु प्रसाद भट्टा यांनी सांगितले की, अपघातस्थळावरून १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि बसमधून २८ जखमी प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिसांचे कर्मचारी बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये न्यूझीलंडचा एक पुरुष प्रवासी आहे. जखमींमध्ये एक जपानी आणि एक डच महिला नागरिक आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी, पोलिसांनी सांगितले की अतिवेग हे कारण असू शकते.

Comments
Add Comment