महाराष्ट्र भाजपकडून 'एसआयआर' समिती गठित

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष सखोल फेरनिरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम जाहीर केला असून, या प्रक्रियेचा राज्यभर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी भाजपने विशेष नियोजन केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात पक्षाची विशेष 'एसआयआर' समिती गठीत केली असून, यात अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.


निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि पात्र मतदारांची नोंदणी सुनिश्चित करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता व्हावी, यासाठी भाजपच्या या समितीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या या महत्त्वाच्या समितीत माजी खासदार किरीट सोमय्या, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, आमदार रणधीर सावरकर, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, माजी आमदार सुनील राणे आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक