Saturday, February 21, 2026

साप्ताहिक राशिभविष्य , २२ ते २८ फेब्रुवारी २०२६

साप्ताहिक राशिभविष्य , २२ ते २८ फेब्रुवारी २०२६

साप्ताहिक राशिभविष्य, २२ ते २८ फेब्रुवारी २०२६

गौरव व प्रशंसेस पात्र ठराल

मेष : आपण केलेले कार्य नावाजले जाऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर असेल. सर्वत्र गौरव व प्रशंसेस पात्र ठराल. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. त्यासाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च कराल. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती उत्तम राहील. सकारात्मक विचारांच्या व्यक्ती भेटतील. नवीन ओळखीतून चांगले लाभ होतील मात्र आपण स्वतः सकारात्मक राहूनप्रतिसाद देणे गरजेचे ठरेल. व्यवसाय धंद्यातील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील नवीन नियोजन करू शकाल अथवा व्यवसाय विस्ताराच्या बाबतीमध्ये विचार करू शकाल बँकांची कामे होतील.  

नियोजन सफल राहील

वृषभ : आपण व्यवसाय धंद्यातील तेजी अनुभवू शकाल.दीर्घकाळ रखडलेली व्यवसायिक येणे अचानक वसूल झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. व्यवसाय धंद्यात काही नवीन बदल करावेसे वाटतील ते जरूर करा व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून ते फायदेशीर ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे म्हणणे ऐकून घ्या. त्याप्रमाणे निर्णय घ्या. व्यवसायिक प्रदर्शने व मुलाखती सफल राहतील. कुटुंबातील मुला मुलींकडून सुवार्ता मिळतील त्याचप्रमाणे कुटुंबात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे तरुण-तरुणींचे प्रश्न निकालात निघतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील नियोजन सफल राहील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. चिंता मिटतील.

अपेक्षित सहकार्य मिळत राहील

मिथुन : कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होण्या मधील अडीअडचणी अथवा समस्या दूर होऊन विवाह निश्चित होतील काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. तरुण-तरुणींना आपला आवडता जीवन साथी निवडता येईल. प्रेमात यश संपादित करू शकाल मात्र अति आत्मविश्वासाने कोणतेही कार्य करू नका गैरसमज होण्याची शक्यता. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय धंद्यात काही नवीन संधी निर्माण होतील त्याचा फायदा अवश्य घ्या. तसेच व्यवसायिक पद्धतीत बदल करावेसे वाटतील.

कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल

कर्क : या सप्ताहात काही चांगल्या गोष्टींचा लाभ घेता येईल नोकरीत मात्र वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल नोकरीत बदल संभवतो धार्मिक कार्यात रस वाढेल आपल्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत दिसतील. महत्त्वाचे प्रश्न सुटल्यामुळे ताणतणाव रहित वातावरणाचा लाभ मिळेल कुटुंबातील मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या कानावर येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल. सामाजिक कार्यात भाग घेऊ शकाल. सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील. एखादे मानाचे स्थान किंवा पद मिळेल.

 सुख समाधान मिळेल

सिंह : सदरील काळामध्ये कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास सुख समाधान मिळेल कुटुंबातील प्रश्नांकडे अथवा समस्यांकडे लक्ष दिल्यास त्या लवकर सुटतील व्यवसाय धंद्यामध्ये परिस्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी येतील त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल व्यवसायातील नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील. स्थावर मालमत्ता विषयीचे प्रश्न सोडविता येतील शेती विषयक कामांना चालना मिळेल कोर्टकचेरीच्या कामात सफलता मिळेल कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील कुटुंबातील बहुतेक सदस्यांचे आपल्याला अपेक्षित सहकार्य मिळेल.

कार्यमग्न राहण्याची गरज 

कन्या : या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवावे प्रयत्न कमी पडून देऊ नयेत सतत कार्यमग्न राहण्याची गरज नोकरीमध्ये वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. तसेच काही नवीन संधी मिळू शकतील त्या संधी न कडे एक आव्हान म्हणून स्वीकारल्या त्याचा फायदा होईल आर्थिक आवक चांगली राहील. आर्थिक लहान-मोठे व्यवहार सावधानतेने करावेत. वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण ठेवा. आरोग्य संबंधी दक्ष राहा. आपल्या बोलण्याने इतरांना आपण मंत्रमुग्ध कराल.

वाद-विवाद टाळा.

तूळ : दीर्घकाळ रखडलेले जमिनी विषयी चे अथवा स्थावर मालमत्तेच्या विषयीचे व्यवहार गतिशील होतील. ओळखी मध्यस्थी मुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. मात्र वाद-विवाद टाळा. तसेच वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे वाद शमतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार मार्ग निघेल .नोकरीतील वातावरण अनुकूल राहील अपेक्षित गोष्टी साध्य होतील पदोन्नती घटना घडू शकतात हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. कुटुंब परिवारात अचानक काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. चर्चेने प्रश्न सुटू शकतात हे लक्षात ठेवा. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांचे परदेश गमन सफल होईल .

महत्त्वकांक्षा पूर्ण होईल

वृश्चिक : हा आठवडा सर्व बाबतीत आनंददायी व अनुकल घटनांनी व्याप्त राहील.बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी महत्त्वकांक्षा अचानक पूर्ण होईल. महत्त्वाची कामे उरकून घ्या. विशेषतः स्थावर व जमिनी विषयी असलेली कामे गतीमान होतील. कुटुंबात असलेले वाद-विवाद व मतभेद संपतील नवीन नात्यास सुरुवात होईल. कुटुंबात व परिवारात मंगल कार्य घडेल. नोकरी-व्यवसायात तसेच धंद्यात अपेक्षित असलेली सर्व कामे होतील. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील मात्र भागीदारी व्यवसायात आपल्या वर्चस्वाला नियंत्रणाखाली ठेवा. व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील.

तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील

धनु : या आठवड्यात आपण काही रखडलेले महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल . कुटुंब परिवारातील समस्या त्यामुळे सुटतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. नोकरीविषयक अनुकूल वार्ता कानावर येतील. पूर्वी दिलेल्या मुलाखती मधून नोकरीचे बोलावणे येऊ शकते. आप्तेष्ट नातेवाईक यांच्याशी संबंध सुधारतील. मंगल कार्याचे निमंत्रण मिळेल. परंतु आपल्या बोलण्याने आणि वर्तणुकीने रंगाचा बेरंग होऊ शकतो त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. नोकरीमध्ये वरिष्ठां बरोबरील वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल .

स्पर्धा टाळा

मकर : महत्त्वाच्या कामात या आठवड्यात अडचणी येण्याची शक्यता आहे थोडा संयम बाळगणे गरजेचे आहे. कामाचा ताण जाणवू शकतो दगदग होईल. व्यवसाय धंद्यात जबाबदारी वाढली केलेल्या नियोजनात अचानक बदल करावा लागल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आपल्याला झेपतील अशी कामे स्वीकारा प्रवास काळजीपूर्वक करा सावधानता बाळगा. प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण हवे तसेच अतिआत्मविश्वास घातक ठरू शकेल. स्पर्धा टाळा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील इतरत्र वेळेचा अपव्यय करू नका तसेच कुसंगती पासून दूर राहा.

आत्मविश्वास वाढेल

कुंभ : सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस घ्यायला दानधर्म करावासा वाटेल धार्मिक स्थळी सहकुटुंब सहपरिवार भेट देण्याचे नियोजन होईल. मानसन्मान वाढेल. काही चांगल्या घटना घडतील त्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल मात्र नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेल नोकरीतील बदल चांगला राहील. सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये अधिकारात वाढ होईल अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता मात्र लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. कुटुंब परिवारातील एखाद्या मंगल कार्यामुळे नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील.

कामे काळजीपूर्वक करा

मीन : पूर्वी केलेल्या नियोजना द्वारे आपली कामे काळजीपूर्वक करा. लहान-मोठी कामे इतरांवर सोपवू नका. कार्यमग्न राहण्याची गरज प्रयत्नात कमी पडून देऊ नका महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात मनावरील ताण काही प्रमाणात निघून जाईल अडचणी दूर होतील व्यवसायात भरभराट होईल नवीन कामे हातात मिळतील व्यवसाय व काम धंद्या निमित्य प्रवास करावा लागेल प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यायला विसरू नका. तसेच खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळेल.
Comments
Add Comment