Pakistan Airstrikes in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; एकाच घरातील १९ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये तणाव सुरु आहे. अशातच काल मध्यरात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सात ठिकाणांवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानने लढाऊ विमानांद्वारे पाकिस्तान-अफगानिस्तान सीमेवर दहशतवादी गटांना लक्ष्य करून हल्ले केल्याचा दावा केला आहे. याबाबत अफगानिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.


या हल्ल्यात बेहसूद जिल्ह्यातील एका वस्ती भागात बॉम्ब हल्ल्यात एकाच कुटुंबातील १९ जणांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला आहे. सांगण्यात येत आहे की घरात २१ लोक होते, त्यापैकी दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 80 वर्षांचा वृद्धापर्यंत ते एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. जखमींमध्ये २० वर्षीय रियाजुल्लाह यांचे नाव समोर आले आहे.



लवकरच बदला घेतला जाईल :


अफगाण अधिकाऱ्यांनी चेतावणी दिली आहे की या हल्ल्याचा “लवकरच बदला घेतला जाईल.” नंगरहार प्रांताच्या पोलिसांनी सांगितले की एकाच कुटुंबातील 23 लोक मलब्यात दबले गेले होते. आतापर्यंत फक्त चार जणांना बाहेर काढता आले आहे आणि घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.


दोन आठवड्यांपूर्वी इस्लामाबादमधील एका शिया मशिदीत आत्मघाती हल्ला झाला होता, ज्यात किमान ३१ जणांचा मृत्यू आणि १६० हून अधिक जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती. हा हल्ला २००८ च्या मारियट हॉटेल बॉम्बस्फोटानंतर राजधानीतील सर्वात घातक हल्ला मानला जात आहे.

Comments
Add Comment

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष; खामेनीच्या ठिकाणाबाबत संभ्रम, खामेनी रशियात ?

मॉस्को/तेहरान : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी घडामोड

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जीवंत आहेत की... ?

तेल अविव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल होत आहे. पण इस्रायल सरकारच्या

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; चीन, जपान, ब्रिटनकडे अमेरिकेची मदतीची हाक

- होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेचे अनेक देशांना आवाहन अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाचा आज

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पची सारवासारव; इराणला युद्ध थांबवायचे आहे पण...

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अशातच शनिवारी (१४ मार्च)

Israel - Lebanon : पश्चिम आशियात नवा ट्विस्ट; इस्रायलसोबत चर्चेसाठी लेबनॉन सज्ज, पण...

लेबनॉनने संकेत दिले आहेत की ते इस्रायलसोबत थेट शांतता चर्चेसाठी तयार आहे. मात्र त्यासाठी आधी युद्धविराम लागणे

Indian Navy in Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीत तणावाचा स्फोट? भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदल अलर्ट मोडवर

पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने फारसच्या आखाताजवळ आपल्या अनेक युद्धनौका तैनात