Chhatrapati Sambhajinagar Police Recruitment: धक्कादायक! पोलीस भरतीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू

मुंबई: पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १६०० मीटरची फिजिकल टेस्ट सुरू होती. या टेस्ट दरम्यान तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मैदानात घडली. या घटनेनंतर भरती प्रक्रियेसाठी आलेल्या हजारो उमेदवारांमध्ये शोक पसरला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्याचा संग्राम धोंडीराम शिंदे पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरला आला होता. शनिवारी सकाळी साधारण ८.१५ वाजता १६०० मीटरची फिजिकल टेस्ट सुरू झाली. संग्रामने उत्साहात धावायला सुरुवात केली. मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो रनिंग लाइनवर पडला. विशेष म्हणजे पहिल्या दोन फेरीत तो पहिला आला होता.



फिजिकल टेस्ट की हृदयाचा आजार?


संग्राम अत्यंत मेहनती आणि जिद्दी होता. पोलिसात भरती झाल्यावर आपल्या कुटुंबातील दारिद्र्य त्याला दूर करायचं होतं. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उडून तो सराव करीत होता. पण नशिबाला हे मान्य नव्हतं. संग्रामच्या अचानक झालेल्या निधनाने शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परंतु ही घटना हार्टअटॅकमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप या प्रकरणातील अधिकृत माहिती कळू शकलेली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच संग्रामला नेमकं काय झालं होतं, हे लक्षात येईल.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही

Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत

नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय