Sunday, February 22, 2026

BIG BOSS MARATHI SEASON 6 : बिग बॉसच्या घरात नवा धमाका? रितेश भाऊंची हिंट, ‘छोटा डॉन’चा जलवा चर्चेत

BIG BOSS MARATHI SEASON 6 : बिग बॉसच्या घरात नवा धमाका? रितेश भाऊंची हिंट, ‘छोटा डॉन’चा जलवा चर्चेत

मुंबई : बिग बॉस मराठी ६ च्या घरात पुन्हा एकदा रंगत चढली आहे. टास्क, वाद आणि अनपेक्षित ट्विस्टमुळे हा सिझन प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. आता मात्र एका नव्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

प्रोमोने वाढवली उत्सुकता

कलर्स मराठी ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. “अस्सल स्वॅग, कडक वाइब्स, मराठमोळा अंदाज… येतंय महाराष्ट्राचं तुफान!” अशा शब्दांत दिलेल्या इशाऱ्यामुळे घरात ‘वादळी’ सदस्याची एंट्री निश्चित मानली जात आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेशची स्टाईल

‘भाऊच्या धक्का’ या विशेष भागात सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी नेहमीप्रमाणे स्पर्धकांचा आठवड्याचा हिशोब घेतला. काहींना सुनावणी, तर काहींना शाबासकी देत त्यांनी वातावरण रंगवले. कॅप्टन म्हणून तन्वीच्या कामगिरीचं कौतुक करताना त्यांनी ‘छोटा डॉन’ प्रभू शेळकेचा खास उल्लेख केला. “या आठवड्याचा नंबर वन खेळ तुम्ही खेळलात” अशी दाद देत त्यांनी त्याचा आत्मविश्वास वाढवला.

सोशल मीडियावर कोण ट्रेंडमध्ये?

प्रोमोमधील “महाराष्ट्राचं तुफान” या शब्दांमुळे प्रेक्षकांनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे. साताऱ्याचे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा घरात येणार का? अशी चर्चा नेटकऱ्यांत रंगली आहे. त्यांनी याआधी बिग बॉसच्या विविध पर्वांमध्ये गोंधळ घालत लक्ष वेधले होते. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले आहे.

समीकरणं बदलणार?

नव्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील गटबाजी, मैत्री आणि रणनीती पूर्णपणे बदलू शकते. येत्या भागांत कोण येणार आणि घरात नेमका कोणता ‘तुफान’ उठणार, याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment