Saturday, February 21, 2026

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘क्रांतीज्योतीची पोर OTT वर घालणार दंगा

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘क्रांतीज्योतीची पोर OTT वर घालणार दंगा

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. मराठी माध्यमाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या कथानकाने अनेकांच्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आता हाच चित्रपट डिजिटल स्वरूपातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

सुमारे दीड महिन्यांहून अधिक काळ चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे धाव घेत या चित्रपटाने जवळपास २५ कोटी रुपयांचा गल्ला कमवला. मराठी भाषेचे महत्त्व, शिक्षणातील संस्कार आणि मातृभाषेबद्दलचा अभिमान या मुद्द्यांवर आधारित कथेमुळे चित्रपट गाजला. ‘इंग्रजी की मराठी?’ हा वादग्रस्त प्रश्नही या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला.

OTT वर कधी आणि कुठे पाहाल ?

हेमंत ढोमे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘क्रांतीज्योती’ हा चित्रपट आता ZEE 5 या OTT प्लॅटफॉर्मवर २७ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या सिनेमाचे डिजिटल प्रीमियर निश्चित करण्यात आले आहे.

दमदार स्टारकास्टची साथ

या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटगृहातील यशानंतर डिजिटल माध्यमावरही ‘क्रांतीज्योती’ला तितकाच प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >