Friday, February 20, 2026

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे

ट्रीपल इंजिनाच्या साथीने मुंबईतील विकासकामांना गती देण्याची दिली ग्वाही

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची शुक्रवारी २० फेब्रुवारी २०२६रोजी बिनविरोध निवड झाली. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्यात न आल्याने या एकमेव अर्जाच्या आधारे पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. घोषणा केली. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ पार पडल्यानंतर सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता शुक्रवारी २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर स्थानापन्न केले. यावेळी आपल्या भाषणामध्ये नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मुंबई महापालिकेत महायुती अशा ट्रीपल इंजिनाच्या साथीने मुंबईतील विकासकामांना गती मिळेल याची ग्वाही देत नागरी कामांकरता केवळ अर्थसंकल्पात तरतूद करणे पुरेसे नसते तर केलेल्या तरतुदींचा उचित आणि विहित वेळेत विनियोग करणे ही बाब प्रशासकीय कामकाजाशी निगडीत आहे. याबबत स्थायी समितीतील माझे सहकारी नगरसेवक यांच्याशी सल्लामसलत करून ही कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. करनिर्धारणातील विविध प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालणार करपात्र मुल्याविरुध्द घेण्यात आलेल्या आक्षेपांचे निराकरण तातडीने केले जात नाही व त्यामुळे विलंब होतो, अशी सर्व कामे तत्परतेने व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देण्याची गरज आहे,असे मत व्यक्त करत करनिर्धारणासाठी मालमत्तेच्या प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र विचारात घेतले जाते तर कधी करनिर्धारणाची तारीख पुढे ढकलून त्या वर्षाची कराची रक्कम वाचवली जाते. अशा करनिर्धारणातील विविध प्रकारच्या गैरव्यवहारांन आळा घालण्यासाठी प्रशासनातील दक्षता विभागाने व महापालिकेचे लेखा परिक्षक यांनीही करनिर्धारणाची छाननी काटेकोरपणे करावी अशाप्रकारची सूचनाही शिंदे यांनी आपल्या भाषणात केली. अनुसूचीमध्ये नामांकित कंपन्यांची अत्याधुनिक औषधे समाविष्ठ रुग्णांना तत्पर आणि योग्य औषधोपचार मिळावा याकरता आपल्या औषधांच्या अनुसूचीमध्ये सुप्रसिध्द व नामांकित कंपन्यांची अत्याधुनिक औषधे समाविष्ठ करण्यात यावी अशाप्रकारचीही सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे. शहरातील स्थानिक प्रजातींचे वृक्ष तसेच पाणथळ भागातील जलपर्णी इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी दिर्घकालीन धोरण राबवयाचीही सूचना त्यांनी केली. अग्निशमन दलाने नव्याने उपाययोजना आखाव्या तसेच उत्तुंग इमारती आणि निमुळत्या रस्त्यांमधून मार्ग काढत लागलेल्या आगीवर शक्य तितक्या जलदगतीने नियंत्रण ठेवता यावे याकरता अग्निशमन दलाने नवीन उपाययोजना अमलात आणाव्यात अशाप्रकारच्या सूचना त्यांनी यामाध्यमातून केली.
Comments
Add Comment