आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी करण्यापूर्वी संबंधित जोडप्याने आपल्या आई-वडिलांना माहिती दिली असल्याची नोंद करणे अनिवार्य ठरणार आहे. या निर्णयामुळे कुटुंबीयांच्या नकळत लग्न करण्याच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गुजरात सरकारने विवाह नोंदणी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. विशेषतः नियम ४४ मध्ये बदल सुचवण्यात आला असून, हा बदल जनहिताचा असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. प्रस्तावानुसार विवाह नोंदणी अर्ज करताना आई-वडिलांची सविस्तर माहिती देणे आवश्यक राहील.



पालकांना अधिकृत सूचना


नव्या प्रक्रियेनुसार, अर्जदार जोडप्याला एक औपचारिक घोषणापत्र सादर करावे लागेल. त्यामध्ये पालकांना विवाहाबाबत माहिती दिल्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर आई-वडिलांचे ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा लागेल. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक निबंधकांकडून संबंधित पालकांना दहा कामकाजाच्या दिवसांत इलेक्ट्रॉनिक किंवा लेखी स्वरूपात सूचना पाठवली जाणार आहे.



ऑनलाइन प्रणाली आणि प्रतीक्षा कालावधी


विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया राज्याच्या केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टलवर हलवण्याचा प्रस्ताव आहे. अर्ज सादर केल्यानंतर तत्काळ प्रमाणपत्र देण्याऐवजी ३० दिवसांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीनंतरच नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाईल.


सरकारने या प्रस्तावावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या बदलांमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या