R Ashwin : 'भारतीय संघाला हरवणे कठीण'; रविचंद्रन अश्विनने केले सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या उत्कृष्ट लयीत असून त्याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. यादरम्यान भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने सांगितले की, भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याची एकूण ताकद इतकी भक्कम आहे की साधारण दिवसातही त्याला पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही.


रविचंद्रन अश्विन याने एका यूट्यूब शोमध्ये सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले. मात्र नेदरलँड्सविरुद्धचा फलंदाजीतील खेळ अपेक्षेइतका प्रभावी नसल्याचेही मान्य केले. अश्विन म्हणाला की सूर्यकुमार यादवने संयमाने डाव पुढे नेला, तर शिवम दुबे , हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी योग्य वेळी रन्स वाढवले तर भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याची एकूण ताकद इतकी भक्कम आहे की साधारण दिवसातही त्याला पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही, असे अश्विनने नमूद केले.


अश्विन पुढे म्हणाला की; “सूर्याने उत्कृष्ट खेळी केली. रन्स करायची वेळ आली तेव्हा दुबे, हार्दिक आणि रिंकू तयार होते. त्यांना रनरेट कसा वाढवायचा हे चांगले ठाऊक आहे. मात्र नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघाची फलंदाजी दमदार नव्हती. वरुण चक्रवर्तीने उत्कृष्ट गोलंदाजी केली."


या दरम्यान अश्विनने तिलक वर्माच्या टी-२० क्रिकेटमधील विचारसरणीवरही भाष्य केलं. टी-२० मध्ये यश केवळ जोरदार फटके मारण्यावर अवलंबून नसते; योग्य टाइमिंग आणि बॅटच्या मध्यभागी चेंडू लागणे अधिक महत्त्वाचे असते, असे आर अश्विनने सांगितले. “तुम्ही वैभव सूर्यवंशीसारखे खेळू शकता, पण तिलकसारखेही खेळू शकता, जो उत्कृष्ट टाइमिंगसह गॅप शोधू शकतो."


रविवारी (२२ फेब्रुवारी) भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाचा सामना खेळणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा सामना होईल. तर १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर-८ फेरीतील अखेरचा सामना खेळला जाईल.

Comments
Add Comment

IPL 2026 : म्हणून श्रेयस अय्यरला भरावा लागणार २४ लाख रुपयांचा दंड

मुंबई : आयपीएल २०२६ च्या सातव्या सामन्यात, पंजाब किंग्सने (पीबीकेएस) चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) ५ गडी राखून

IPL 2026 : पंजाबची चेन्नईवर ५ विकेट्सने मात; आयुष म्हात्रेची झुंजार खेळी व्यर्थ

- सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव; घरच्या मैदानावर नामुष्की पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला पाच गडी राखून

यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला.

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर