शेवट गोड झाला, ऑस्ट्रेलियाचा ओमान विरूद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा पराभव केला. या सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला तरी त्यांचे वर्ल्डकपमधील आव्हान आधीच संपले आहे, त्यात बदल होणार नाही. ओमान विरुद्धचा सामना नऊ विकेट राखून जिंकत ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्डकपमधील त्यांच्या प्रवासाचा गोड शेवट केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ओमानला १६.२ षटकांत गुंडाळले. ओमानने फक्त १०४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ९.४ षटकांत एक बाद १०८ धावा केल्या. ओमानच्या चार फलंदाजांना बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा अॅडम झंपा सामनावीर झाला. त्याने ३.२ षटकांत २१ धावा देत चार बळी घेतले. झंपाने हम्माद मिर्झा (१६ धावा), मोहम्मद नदीम (२ धावा), शकील अहमद (३ धावा), शफीक जान (शून्य धावा) या चौघांना बाद केले.


ओमानची फलंदाजी


प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ओमानकडून आमिर कलीमने शून्य, जतिंदर सिंगने १७, करण सोनावलेने १२, हम्माद मिर्झाने १६, वसीम अलीने ३२, मोहम्मद नदीमने २, विनायक शुक्लाने ९, जितेन रामानंदीने १, शकील अहमदने ३, जय ओडेद्राने नाबाद ४, शफीक जॉनने शून्य धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून झंपाने ४ तर ग्लेन मॅक्सवेल आणि झेवियर बार्टलेटने प्रत्येकी २, नॅथन एलिस आणि मार्कस स्टोइनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.


ऑस्ट्रेलियाची फलंदाजी


धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या कर्णधार मिचेल मार्शने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकार मारत नाबाद ६४ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने १९ चेंडूत ६ चौकार मारत ३२ धावा केल्या. त्याला शकील अहमदने स्वतःच्या चेंडूवर स्वतःच झेलबाद केले. जोश इंगलिसने ६ चेंडूत २ चौकार मारत नाबाद १२ धावा केल्या.

Comments
Add Comment

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा

पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर

The Hundred Auction : काव्या मारनच्या 'त्या' कृतीवर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये