महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात संग्रहालय फिरणार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने “मराठा व समकालीन शस्त्रांचे फिरते संग्रहालय” या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश मराठा इतिहासातील शौर्यपरंपरा, युद्धकला आणि पारंपरिक शस्त्रसंपदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा, असून फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत हा ऐतिहासिक ठेवा प्रदर्शित केला जाणार आहे. मंत्री शेलार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन इतिहास संवर्धनासाठी शासन कटिबद्ध आहे.
महाराजांची ४०० वी जयंती जागतिक स्तरावर साजरी होणार मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त ...
या संग्रहालयात मराठा व समकालीन शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तलवार, भाले, धनुष्यबाण, दांडपट्टा यांसह विविध शस्त्रे आणि त्यांची माहिती देण्यात आली आहे. या संग्रहालयांमुळे तरुण पिढीत इतिहासाविषयी अभिमान आणि जागर निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त मंत्री शेलार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, संचालिका मीनल जोगळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थितीत होते.






