अमृता फडणवीस यांनी दिला नोकरीचा राजीनामा

२३ वर्षांच्या यशस्वी बँकिंग प्रवासाला पूर्णविराम; 'मॅनेजमेंट ट्रेनी' ते 'वरिष्ठ उपाध्यक्ष' असा प्रेरणादायी प्रवास


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅक्सिस बँकेत 'वरिष्ठ उपाध्यक्ष' या जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अमृता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या प्रवासाला पूर्णविराम देत असल्याची माहिती दिली.


अमृता फडणवीस यांचा अ‍ॅक्सिस बँकेतील प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. २३ वर्षांपूर्वी त्यांनी याच बँकेत 'मॅनेजमेंट ट्रेनी' (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) म्हणून आपल्या करिअरची साधी सुरुवात केली होती. मात्र, आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा, सातत्य आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रगतीचा एकेक टप्पा पार केला. शाखा संचालन, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी आणि ग्राहक संबंध अशा अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या विभागांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले.



राजीनाम्यानंतर दिली भावनिक प्रतिक्रिया


राजीनाम्याची माहिती देताना अमृता फडणवीस यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “अ‍ॅक्सिस बँक ही संस्था म्हणजे माझे कुटुंब, गुरु आणि दुसरे घर होते. या प्रदीर्घ प्रवासात साथ देणारे सहकारी, मार्गदर्शन करणारे वरिष्ठ आणि विशेषतः बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे मनापासून आभार”.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी