AI for Agri 2026: एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषद


“कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार,वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


एआय फार ॲग्री २०२६ (AI for Agriculture 2026) ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम,एफएओ,युएनडीपी,आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (ADB), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर इी सेमी ॲरीड ट्रापीक्स(ICRISAT), भारतीय विज्ञान संस्था (IISc), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.



एआय फार ॲग्री २०२६ परिषदेची रूपरेषा:


दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते १० या वेळेत नोंदणी करण्यात येईल. सकाळी १० ते ११.२० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन होईल. जस्मीन हॉल येथे कृषि क्षेत्रात जबाबदार एआयचा वापर करून लिंग आधारित डिजिटल दरी भरून काढणे मिटींग रुम २०४ मध्ये ‘कृषी उत्पादनासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI): लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलबजावणी “ आणि मिटींग रूम २०२ मध्ये ‘संस्थात्मक वित्तपुरवठा माध्यमातून संरचनात्मक आराखडा तयार करूनएआय फॉर ॲग्रीला गती देणे “या तीन विषयावर एकाच वेळी चर्चासत्र होतील.


त्यानंतर सकाळी ११.२० ते ११.३० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. सकाळी ११.३० ते १ ते ५ या वेळेत इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय सचिव देवेश चतुर्वेदी, मुख्य सचिव. राजेश अग्रवाल, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर , डिजीटल एफएओचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देजान जाकोवेजिक, सीफोरआयर इंडिया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्य सल्लागार जे. सत्यनारायण , आयएफएडीच्या आयसीटीच्या तांत्रिक कायदेशीर सल्लागार बेंड्रा गुंडे,युनडीपीच्या निवासी सल्लागार डॉ.ॲजेला लुसिगी यांची व्याख्यान होणार आहेत.


दुपारी २ ते २.५० या वेळेत एच. टी. पारेख फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक एस. पारेख,केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय महासंचालक, आयसीएआर आणि सचिव (डीएआरई) डॉ. मांगी लाल जाट, इंडिया अल मिशन, अतिरिक्त मिशन संचालक आणि सीईओ अभिषेक सिंह,एडीबी इंडिया रेसिडेंट मिशन मियो ओका कंट्री डायरेक्टर, कंट्री संचालक मिया ओका,यूएन वुमनच्या कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह इंडिया कांता सिंह यांची व्याख्यान होतील.



मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन:


कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३ ते ४.१० या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. जितेंद्र सिंह,कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,इंडिया एआय मिशनचे अतिरिक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह,अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाएजिक्स , भिली आदिवासी भाषा मोठ्या भाषा मॉडेल (LLM) चे लाँचिंग इव्हेंट, महाविस्तार व्हॉइस टेलिफोनी , वनस्पतींचे कीटक व रोग ओळख या विषयी सामन्जस्य करार होणार.


दुपारी ५ ते ५.३० या वेळेत जस्मीन हॉल येथे मूल्य साखळी ओलांडून : समावेशकता, शाश्वतता आणि कार्यक्षमता वाढवणे , मिटींग रूम २०४ येथे एफॉर ॲरन साठी सामायिक डिजिटल पाया निधीची तरतूद करणे, मिटींग रूम २०२ येथे “स्टॉर्टअप साठी नव्या संधी “ या विषयावर व्याख्यान होतील.


दुपारी ५.३० ते ७.३० या वेळेत “महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज : सुरक्षित, कृषी नवोपक्रमाला गती देणे, “एफपीओ शेतीमधील स्टार्टअप्ससाठी प्रवेशद्वार”या विषयावर मिटीम रूम २०४ येथे व्याख्यान होतील. एआय कन्व्हर्जन्स मार्ग: उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयावर मिटींग रूम २०२ मध्ये व्याख्यान होतील. संध्याकाळी ७.३० ते ९.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत जॅस्मिन हॉल येथे “कृषी क्षेत्रातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक यांची जागतिक स्थिती” या विषयावर त्याचवेळी मीटिंग रूम २०४ मध्ये “डिजिटल कृषी वित्तीय मॉडेल्सचा विस्तार” या विषयावर तर मीटिंग रूम २०२ मध्ये “ “समानतेसाठी कोडिंग : लिंग-आधारित कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय” या विषयावर चर्चा होणार आहे.


दुपारी १२ ते १ या वेळेत जॅस्मिन १ सभागृहात “कृषी-एआय भविष्यकालीन गुंतवणूक : गुंतवणूक, बाजारपेठ व विस्तारक्षम नवकल्पना” या विषयावर ,मीटिंग रूम २०४ मध्ये “सुरक्षा, पारदर्शकता व जोखीम व्यवस्थापन यंत्रणा” या विषयावर, तर मीटिंग रूम २०२ मध्ये “दूरसंवेदन व स्थानिक बुद्धिमत्तेद्वारे मोठ्या प्रमाणावर कृषी परिवर्तन” या विषयावर चर्चा होणार आहेत.


दुपारी २ ते ३ या वेळेत जॅस्मिन १ सभागृहात “जागतिक एआय-सक्षम कृषी संशोधन नेटवर्कची उभारणी”या विषयावर,. मीटिंग रूम २०४ मध्ये “‘तिच्यासाठी सह-रचना’ : भारत व जागतिक स्तरावर महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक एआय उपाय” या विषयावर. तर मीटिंग रूम २०२ मध्ये “कृषी क्षेत्रातील जनरेटिव्ह एआय” या विषयावर चर्चा सत्र होणार आहेत. दुपारी ३.३० ते ५ या वेळेत ‘गुंतवणूक चर्चा’,सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत समारोप सत्र, एआयफॉर अॅग्री २०२७ परिषदेच्या थीमची घोषणा करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री