Wednesday, February 18, 2026

कन्नमवार नाल्याची भिंत उभारण्याचा मार्ग मोकळा, ३९ बांधकामांवर कारवाई

कन्नमवार नाल्याची भिंत उभारण्याचा मार्ग मोकळा, ३९ बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाकडून बुधवारी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे, सुमारे २४० चौरस मीटर परिसर नाल्याची संरक्षण भिंत उभारण्यासाठी मोकळा झाला. उप आयुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एस विभाग) सय्यद समरिन यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने कन्नमवार नगर नाल्याभोवती संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामामुळे एकूण ४३ बांधकामे अंशत: बाधित होत होती. या नाल्यावरील बांधकामांमुळे नाल्याच्या संरक्षक भितींच्या बांधकामामध्ये अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ही बांधकाम हटवल्याशिवाय नाल्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यास विलंब होत होता. त्यामुळे नाल्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम तातडीने करण्याच्यादृष्टीकोनातून महापालिकेच्या एस विभागाच्यावतीने अखेर बांधकामांवर कारवाईची मोहिम हाती घेतली. यापैकी ३९ अंशत: बाधित बांधकामांवर बुधवारी तोडक कारवाई करण्यात आली. तर, उर्वरित ४ बांधकामांवरही लवकरच कारवाई करण्यात येईल असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >