कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली; सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे


पुणे  : माझा भाऊ नाही. माझा दादा इतक्या मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहिलं. आता कुणासोबत काय खोटं करायचं, जे खरं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आता कशी कुणाची उणीदुणी काढायची. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केलं नाही. आम्ही या देशाचे, राज्याचे सेवक आहोत. लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमचं ऑबजेक्टिव्ह काय आहे तर लोकांची काम करावीत. मतदारसंघाचा विकास करावा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं


याप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.याप्रकरणी आम्हाला राजकारण करायचंच नाही. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. हा राजकारणाचा विषयच नाही. दादा गेल्याने आम्ही सर्वच भावनिक आहोत. जगात माणुसकी उरली आहे की नाही. दादा गेल्यावर अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही आता पुढे पाहतोय. या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे हा एक भाग आणि दुसऱ्या भागात देशासमोरील आव्हानं, काम पूर्ण करणं अशा दोन्ही ठिकाणी आम्ही कारत आहोत,तर स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांना साथ देणार,असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


सुप्रिया सुळे म्हणाल्या की,रोहितची अस्वस्थता ही सहाजिक आहे. अशी मोठी घटना घडते तेव्हा अस्वस्थ वाटणे हे सहाजिक आहे. रोहित हे सातत्याने ती उत्तरं शोधत आहे. आमच्या घरात जे झालं, ते कुणाच्याही घरात होऊ नये हाच यामागचा विचार आहे. चौकशी ही पारदर्शक व्हायला पाहिजे ही तमाम महाराष्ट्राची मागणी आहे. अभ्यासपूर्वक फॉलोअप रोहित करत आहेत. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल असे मला वाटते. ब्लॅक बॉक्सबाबत तांत्रिक माहिती मिळेलच याबाबत मला शंका नाही, असेही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.


पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्र असू. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यात पुढील निर्णय होईल, माझं पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं आहे, पीडित कुटुंबीयांस न्याय भेटला पाहिजे, तिथं शांतता राहिली पाहिजे, तसेच, हा विषय वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,महाराष्ट्रात नवीन ट्रॅन्ड झालाय, आमचं म्हणणं आहे हिंसा होऊ नये,असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News: मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा, रस्त्यामध्ये हरवलेली 2 लाख 90 हजार रूपये असलेली पिशवी मालकाला शोधून दिली...

मुंबई: मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीचे हरवलेले तब्बल 2 लाख 90 हजार रूपये शोधून दिले आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या

National Film Awards 2026 : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी! अंतिम टप्प्यात तयारी, चित्रपटसृष्टीत उत्सुकता

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सणासुदीत भेसळखोरांवर FDAचा दणका! 32 हजार किलोचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाकडून मुंबई, पुणे, कोकणसह इतरत्र महाराष्ट्रामध्ये धडक कारवाई केली आहे. सणासुदीच्या

Ghatkopar Crime : मुंबईतील घाटकोपरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट; वादातून मंडळाच्या अध्यक्षाला संपवलं, घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई : गणेशोत्सवाच्या आनंदात आणि उत्साहात असताना मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर परिसरात एक अत्यंत

CSK Head Coach: झहीर खान यलो आर्मीत! महेंद्रसिंह धोनीला आयपीएल 2027 स्पर्धेत करणार मार्गदर्शन

Mumbai : चेन्नई सुपर किंग्सने भारताचा माजी वेगवान डावखुरा गोलंदाज झहीर खान यांची २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग

Chandrashekhar Bawankule News: महसुलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे केंद्रीय सचिवांकडून कौतुक

मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या