Wednesday, February 18, 2026

PM Modi : 'हिंदवी स्वराज्या'च्या वैभवाने विदेशी पाहुणे मंत्रमुग्ध! पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना घडवले महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन

PM Modi : 'हिंदवी स्वराज्या'च्या वैभवाने विदेशी पाहुणे मंत्रमुग्ध! पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना घडवले महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्यात महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारा एक अविस्मरणीय सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीने आणि तुतारीच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर ऐतिहासिक वातावरणाने भारावून गेला होता. एका भव्य दालनात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ प्रतिमा (जिवंत कलाकृती) साकारण्यात आली होती. महाराजांच्या वेशभूषेतील कलाकार सिंहासनावर विराजमान असताना, त्यांच्या दोन्ही बाजूंना पारंपारिक मावळे आणि तुतारी वादक उभे होते.
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

तुतारीचा निनाद आणि शाही स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे स्वागत करण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा गजर करण्यात आला. विशेषतः 'तुतारी'च्या ललकारीने या स्वागताचा थाट अधिकच वाढवला होता. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना या ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आणि दोन्ही नेत्यांनी या कलाकृतीचा आनंद घेतला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >