Wednesday, February 18, 2026

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी या सोहळ्याला गांधीनगरसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. हा पुतळा २१ फूट उंचीचा असून, तो गांधीनगरमधील नागरिकांना आणि विशेषतः युवा पिढीला अनेक दशके राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देत राहील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे कार्य कधीही कालबाह्य होणार नाही. राष्ट्र त्यांच्या ऋणात सदैव राहील," अशा शब्दांत शाह यांनी महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. महाराष्ट्र समाजाने घेतलेला हा पुढाकार गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक बंध अधिक दृढ करणारा ठरला आहे. "ज्या काळात गुलामगिरीचा दाट अंधार होता, अशा कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करण्याचा दृढ संकल्प केला. हा केवळ सत्तेचा बदल नव्हता, तर स्वाभिमानाचा आणि स्वराज्याचा उदय होता." या पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आता गुजरातच्या मातीतही तरुणांना धैर्याची आणि स्वाभिमानाची शिकवण देणार आहे.

'शिवाजी महाराजांच्या विचारांमुळेच आज भारत जगासमोर तेजस्वी'

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी या सोहळ्याला गांधीनगरसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. हा पुतळा २१ फूट उंचीचा असून, तो गांधीनगरमधील नागरिकांना आणि विशेषतः युवा पिढीला अनेक दशके राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देत राहील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे कार्य कधीही कालबाह्य होणार नाही. राष्ट्र त्यांच्या ऋणात सदैव राहील," अशा शब्दांत शाह यांनी महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. महाराष्ट्र समाजाने घेतलेला हा पुढाकार गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक बंध अधिक दृढ करणारा ठरला आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आता गुजरातच्या मातीतही तरुणांना धैर्याची आणि स्वाभिमानाची शिकवण देणार आहे.

Comments
Add Comment