मुंबई : रोजच्या धावपळीत लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. मोबाईलवरून तिकीट आणि मासिक पास काढण्यासाठी वापरले जाणारे Railway UTS App येत्या १ मार्चपासून बंद केले जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाने डिजिटल सेवांमध्ये बदल करत हे अॅप टप्प्याटप्प्याने मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्याऐवजी आता सर्व सुविधा Rail One App या नवीन अॅपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहेत.
कोणत्या सेवा थांबल्या?
मासिक पास काढणे, नूतनीकरण, प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग आणि डिजिटल पाकीट भरणा या सुविधा आधीच बंद करण्यात आल्या आहेत. याच सर्व सोयी प्रवाश्याना रेल वन या अॅपमध्ये मिळणार आहेत.
वैध पासधारकांनी काय करावे?
ज्यांचे पास १ मार्चनंतरही वैध आहेत, त्यांना रेल वन या अॅपमध्ये नवीन अॅपमध्ये ट्रान्सफर सुविधा उपलब्ध आहे. नवीन अॅप डाउनलोड करून नोंदणी पूर्ण केल्यानंतर पास सहजपणे वापरता येणार आहे.
बदल का महत्त्वाचा?
डिजिटल सेवा अधिक सुलभ आणि एकत्रित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, मात्र भविष्यातील सोयीसाठी हा बदल आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाचे सांगितले आहे.







