T20 World Cup 2026 NZ vs Can: कॅनडाला हरवत न्यूझीलंड संघाचा दिमाखात 'सुपर ८' मध्ये प्रवेश

चेन्नई: आज १७ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा या मॅचमध्ये ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडसाठी टी-२० विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावत कॅनडावर आठ विकेट्सने विजय मिळवला आणि ग्रुप डी मधून सुपर ८ मध्ये आपले स्थान देखील निश्चित केले.


दोन्ही संघांसाठी जिंकणे आवश्यक असलेल्या या सामन्यात, कॅनडाने फलंदाजीचा निर्णय घेतला. युवराज समर आपल्या विक्रमी ११० धावांच्या खेळीमुळे टी२० विश्वचषक इतिहासातील सर्वात तरुण शतक करणारा खेळाडू ठरला. कॅनडाने दिलेले १७४ धावांचे लक्ष न्यूझीलंड संघाने १५.१ ओवरमध्ये पूर्ण करत सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या सामन्यात ग्लेन फिलिप्सने ३६ चेंडूंमध्ये ७६ धावा करून 'प्लेअर ऑफ द मॅच' चा किताब पटकावला.


या सामन्यात कॅनडाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांचा सलामीवीर युवराज समराने शतकी खेळी केली. त्याने ६५ चेंडूत ११० धावा केल्या. त्यामुळे कॅनडाने २० षटकात ४ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात वाईट झाली. टीम सीफर्ट ६ धावा करत बाद झाला. त्यानंतर पाठोपाठच फॉर्ममध्ये असणारा फिन ऍलनही २१ धावा करत बाद झाला. त्याने ८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार मारले. यामुळे ३.१ षटकात न्यूझीलंडची स्थिती ३० धावा आणि २ विकेट्स अशी झाली. पुन्हा एकदा मोठा उलटफेर दिसतो की काय असे वाटत असताना रचिन रविंद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी ताबडतोब फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.





रविंद्र आणि फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ चेंडूत १४६ धावांची भागीदारी केली. ही न्यूझीलंडची टी२० विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. पहिल्या स्थानावर सीफर्ट ऍलनने याच स्पर्धेत केलेली नाबाद १७५ धावांची भागीदारी आहे.


यावेळी रविंद्र ३९ चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तसेच फिलिप्सने २२ चेडूतच ५० धावा पूर्ण केल्या. यामुळे तो टी२० विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला.


न्यूझीलंडच्या या विजयामुळे अफगाणिस्तान, कॅनडा आणि युएई हे संघ स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे ग्रुप डी मधून आता दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन संघ सुपर ८ मध्ये पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

IPL 2026 : पंजाबची चेन्नईवर ५ विकेट्सने मात; आयुष म्हात्रेची झुंजार खेळी व्यर्थ

- सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव; घरच्या मैदानावर नामुष्की पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला पाच गडी राखून

यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला.

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी