BBC ISWOTY 2025: महाराष्ट्राच्या मुलीचा 'बीबीसी'कडून मोठा सन्मान; ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी

नवी दिल्ली: महाराष्ट्राची लाडकी आणि भारताची सुपरस्टार उपकर्णधार स्मृती मानधना हीचा बीबीसी कडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. स्मृतीला २०२५ साठी बीबीसी 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.


भारतीय महिला संघाने २०२५ साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाच्या या विजयात स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने महत्त्वाची अशी कामगिरी बजावली होती. त्यामुळेच स्मृती मानधना ही 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर' पुरस्काराची मानकरी ठरली. सोमवारी (१६ फेब्रुवारी) दिल्लीत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात बीबीसी पुरस्काराच्या मानकऱ्यांना गौरवण्यात आले आहे.





स्मृती मानधना ही सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. परदेशात असल्यामुळे ती कालच्या या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. मात्र तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल बीबीसीचे आभार मानले. भारतीय महिला क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष खूपच खास राहिले. भारतीय संघाच्या विश्वचषक विजयात मी योगदान देऊ शकले, याचा मला आनंद असल्याची भावना स्मृती मानधना हिने यावेळी बोलून दाखवली.


स्मृती सोबतच बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर (उदयोन्मुख खेळाडू) म्हणून बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, बीबीसी पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर म्हणून पॅरा-अ‍ॅथलीट प्रीती पाल आणि बीबीसी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणून नेमबाज अंजली भागवत यांना गौरण्यात आले.

Comments
Add Comment

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी