Nitesh Rane : मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी


महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर


मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी महापौर पदावर निवड झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांचे अभिनंदनही केले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईच्या जडणघडणीत व दैदीप्यमान वाटचालीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. मुंबई आणि कोकणी माणूस हे एक अतूट समीकरण असून आज मुंबईत वास्तव्यास असलेला मोठा वर्ग हा मूळचा कोकणातील आहे.



कोकणातील नागरिकांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असल्याने कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण, वैद्यकीय उपचार व रोजगारासाठी मुंबईत येत असतात. मात्र मुंबईत येणाऱ्या कोकणवासीयांसाठी आजतागायत कोणताही हक्काचा निवारा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले आहे.

कोकणातील कला, साहित्य, इतिहास व सामाजिक उपक्रमांचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक कला-केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईत उच्च शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी येणाऱ्या कोकणवासीयांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
Comments
Add Comment

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना