एआय सर्वांसाठी

सन २०२५-२६ पासून भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय या क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले. केंद्रीय चौकट जी २०२५ मध्येच निश्चित करण्यात आली होती. तिला आता व्यापक स्वरूप देण्यात आले. दिल्लीच्या भारत मंडपम येथे परिषद भरत आहे. एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ तंत्रज्ञान म्हणून न करता तिचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी आणि विकास करण्याचा उद्देश आहे.


सुरुवातीला या एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी १०,३७१.९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या द्वारे एआय संपूर्ण भारतासाठी कसे उपयुक्त ठरेल आणि मूलभूत मॉडेल्स आणि डेटा बेसेसाठी एआय तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरेल हे या परिषदेतून सांगितले जाईल. विषय सर्वसामान्यांना थोडा कळण्यास अवघ़ड आहे. पण यासाठीच परिषद आहे. एआयचा उपयोग करून सामान्यांचे जीवन कसे सुसह्य करता येईल. लोकसमूह, ग्रह आणि प्रगती ही ती सूत्रे आहेत. ज्यांच्या भोवती परिषदेत काम केले जाईल आणि ही सूत्रे समावेशकता, शाश्वत आणि मानवी केंद्रीत एआय या भोवती रचना तयार करण्यात आली.


लोकसमूह याचा अर्थ मानव केंद्रित एआय असून मानवतावादाची सेवा मानवांचे हक्क आणि सार्वजनिक सेवांप्रती सर्व लोकांना अधिकार तसेच विश्वासाची बांधणी करून देता येतो यावर हे सूत्र आधारलेले आहे. एआय समावेशक आणि मानवी प्रतिष्ठा यांना आणि भारतातील सांस्कृतिक वैविध्याचा आदर राखून जपवणूक करेल असे दुसरे सूत्र आहे. आपला ग्रह पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत एआय पद्धतींना अनूकूल राहील असाही उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊर्जा सक्षम तंत्रज्ञान आणि जबाबदारीने वापर करून हवामान कृतींना पाठिंबा देईल अशी लवचिकता प्रदान करेल असे तंत्रज्ञान उभारणे असा आहे. भारतात भरणाऱ्या परिषदेची व्याप्ती इतकी मोठी आहे, की भारत मंडपम येथे भरणाऱ्या परिषदेत २.५ लाख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. यात परदेशातून फ्रान्सचे ईमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझिलचे लुला डासिल्व्हा, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेझ आदींसह उपस्थित रहाणार आहेत आणि परदेशातून तज्ज्ञ या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यात सुंदर पिचाई, सेमी कंडक्टर आणि फाईव्ह जी तंत्रज्ञान राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले क्रिस्तियानो एमोन आदींचा समावेश आहे.


नवी दिल्लीत सुरू होणारी परिषद ही भारतासाठी अशा प्रकारची पहिलीच परिषद आहे आणि एआय धोक्यांचे कसे व्यवस्थापन करायचे हे शिकवणारी आहे. तसेच नावीन्यपूर्ण संशोधनाला रुळावर व्यवस्थित कसे ठेवायचे याचाही विचार केला जाणार आहे. याची जी चौकट आखली आहे ती एआयचा वापर करताना पक्षपात आणि गैरवापराला आळा घालणे आणि तसे करतानाही भारताचे हेतू जबाबदार एआय व्यवस्थापन करणे यापुरते मर्यादित आहे. या परिषदेतून भारताचा हेतू हा स्पष्ट होतो, की जबाबदार एआय गव्हर्नन्सला आकार देण्याचा आहे. पण यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की एआयच्या मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती आरोग्य, शिक्षण, कृषी आणि वित्त यात कशी उपयोगात आणली जातील यावर विचार करण्याचा आहे. कठोर नियंत्रणाशिवाय चौकटीने सात व्यापक सूत्रे निश्चित केली आणि जी धोरणकर्ते आणि उद्योग या दोघांनाही मार्गदर्शन करतील. यामध्ये विश्वास हा पाया, पीपल फर्स्ट म्हणजे लोक सर्वोपरी, संशोधनापेक्षा संयम महत्त्वाचा आणि समानता आणि जबाबदारी यांचा समावेश आहे. या सूत्रांचा यावर भर आहे, की एआय सिस्टीमनी मानवी निर्णय प्रक्रियेला पाठिंबा दिला पाहिजे आणि तरीही ते पारदर्शक आणि कोणतेही पक्षपात टाळून साध्य करता आले पाहिजे. या परिषदेचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य हे आहे, की सध्याच्या कायद्यावरील अवलंबितता. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की अनेक एआयशी संबंधित धोके हे सध्याच्या कायदेशीर चौकटीत समाविष्ट आहेत आणि त्यात आयटी नियमावली आणि गुन्हेगारी कायदे यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्वांत असे सांगितले आहे, की एआय डेव्हलपर्स आणि डिप्लॉयर्सकडून काय अपेक्षा आहे. संशोधनाला प्राधान्य देऊन सरकारने केवळ ते एआयचा प्रमुख वापर करणारे नाही तर जबाबदार आणि समावेशक कारभार जो भारताचा २०४७ साली साकार होणारा विकसित भारत दृष्टिकोन साध्य करणारा असेल असे सिद्ध करू पाहत आहे.


एआयचा उपयोग विविध कारणांसाठी होतो आणि हेच या परिषदेचे सार आहे. रोजगार, भाषा, नवीन रोजगार मिळवणे, सार्वजनिक सेवा आणि सामान्य लोकांना लाभप्रद होतील अशा योजना राबवणे यासाठी एआयचा उपयोग कसा करता येईल या दृष्टीने या परिषदेत विचार केला जात आहे. ब्रिटनचे उपपंतप्रधान डेव्हीड लॅमी आणि एआय मंत्री कनिष्क नारायण हे भारतात आलेल्या शिष्ट मंडळात आहेत. त्यांनी सांगितले, की एआयचा उपयोग करून रोजच्या जीवनात कसा सामान्याना लाभ करून देता येईल आणि जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात एआयचा उपयोग करून डॉक्टर त्वरीत रोगनिदान करतील, शिक्षक शिकवण्यात नवनवीन पद्धती आणतील आणि परिषदा सेवा झटपट देऊन उद्योग नवीन जनरेशनचे रोजगार तयार करतील हे पहाण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. एआय हे अभूतपूर्व वचन देते की जागतिक आव्हानांना जसे की सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण आणि शेतीत उत्पादकता वाढवणे आणि त्यासोबतच मानवी हक्कांचा आदर करणे याबाबत क्रांतिकारी आहे. एआय पद्धतींचा वापर जर उपयोगकर्ते आणि विकासक यांच्यामार्फत झाला तर समाजाला त्याचा शेवटी प्रचंड लाभ होऊ शकतो. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असूनही भारतात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि डिजिटल बाजारपेठांपैकी ती सर्वात वेगाने वाढणारी आहे. मानवता, समावेशक वाढ आणि शाश्वत विकासासाठी एआयचा उपयोग केला पाहिजे असे जे भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले ते अगदीच योग्य आहे. ही शिखर परिषद राष्ट्रीय क्षमता, आर्थिक लवचिकता आणि दीर्घकालीन क्षमतांचा सक्षम देश म्हणून भारताची ओळख निश्चित करेल. अत्यंत झपाट्याने बदलत असलेल्या एआयचे जग समजण्यासाठी आणि एआयचा उद्देश्य सामान्य जनांपर्यंत पोहोचवणे हा या परिषदेचा हेतू आहे. भारत भरवत असलेल्या या परिषदेची संकल्पना आहे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. हा हेतू सर्व काही सांगून जाणारा आहे. यावेळी परिषदेचा हेतू एआयपासून धोका हा केवळ नाही तर एआयपासून सामान्य लोकांना होणारा फायदा हाही आहे.

Comments
Add Comment

एकत्रिकरणाचं भवितव्य

ज्यांच्या आग्रहाखातर दादा वेगळे झाले, त्या बहुतेक सगळ्या नेत्यांचा दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाला विरोध होता,

पेरले ते उगवले

पाकिस्तानातील मशिदीतील स्फोटाची जबाबदारी घेणारा आयसिस म्हणजे इराक आणि सीरीयातील सुन्नी मुस्लिम गट आहे.

आडवा टँकर

१७ टन ज्वालाग्रही वायू कोचीहून गुजरातला घेऊन जाणाऱ्या या टँकरला मार्गात आणखी शंभर प्रकारच्या अडचणी येऊ शकल्या

चोरीचा मामला

भारतीय दंड संहितेच्या कलम ३७८ नुसार चोरी म्हणजेच, वस्तू पळविण्याचा एक गंभीर गुन्हा आहे. एखाद्याच्या संमतीशिवाय

अंकल सॅमचा मदतीचा हात

सगळ्या जगावर टॅरिफ युद्ध लादणारे अंकल सॅम यांनी अखेर नमते घेतले. भारतावर लादलेले ५०% टॅरिफ १८ टक्क्यांवर

महाराष्ट्राला लॉटरी

मुंबई, पुणे आणि नागपूर ही महाराष्ट्राची महत्त्वाची शहरे आणि येथेच सर्वाधिक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे या