मुंबई : आजकालची मुलं अपमान अगदी सहजरित्या सहन नाही करू शकत, कोणी त्या अपमानाला सडेतोड उत्तर देत तर कोणी आपलं जीवनच संपवत, आपल्या इज्जतीसमोर आत्महत्या हा पर्याय मुलांना खूप सोप्पा वाटतो.. अश्याच एक अपमानातून आणि नैराश्यातून एका मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं घडलं काय ?
श्याम पाटील हा विद्यार्थी जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिकत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य यांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे तो नैराश्यात होता. संपूर्ण वर्गामोर आपल्याला सरांनी मारल्याने त्याला लाज वाटत होती आणि याच गोष्टीमुळे त्याने आत्महत्येसारखं टोकच पाऊल उचललं.
काय लिहिलंय त्या नोटमध्ये
श्यामने त्याच्या पप्पांना उद्देशून लिहिलंय की त्याची यात काही चूक नव्हती, मित्रांचे भांडण सोडवताना एकाने माझी कॉलर पकडली, त्याला मीही कानाखाली मारली, आणखी भांडण वाढायला नको म्हणून प्राचार्यांकडे गेलो असतो संपूर्ण स्टाफसमोर आणि मित्रांसमोर त्यांनी पीव्हीसी पाईपाने मारले. आणि दुसऱ्या मुलाला हातही लावला नाही. याआधीही अनेक वेळा असे झाले होते माझी काही चूक नसताना मी सरांचा आणि मित्रांचा खूप मार खाल्ला होता. माझी काहीच चूक नाही तुम्ही सीसीटीव्ही नक्की चेक करा. माझ्याकडून हे आणखी सहन होत नाही म्हणत २० वर्षाच्या श्याम पाटील ने गळफास घेत आत्महत्या केली.







