T20 World Cup 2026: विश्वचषकाला दुखापतीचं ग्रहण; एकाच दिवशी तीन क्रिकेटपटू दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर

यावर्षीच्या टी २० विश्वचषकाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. एकाच दिवसात ३ खेळाडूंनी या स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. खुद्द आयसीसीने याची माहिती दिली आहे.


आयसीसीने म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, नामिबियाचा बेन शिकोंगो आणि स्कॉटलंडचा सफयान शरीफ यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. विविध दुखापतींमुळे हे तिन्ही क्रिकेटपटू २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यांच्या जागी बदली क्रिकेटपटूंची घोषणाही करण्यात आली आहे.


ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हेझलवूडने पायाच्या दुखापतीमुळे अधिकृतपणे २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता आणि त्यानंतर अ‍ॅशेस मालिकेमधूनही तो खेळू शकला नव्हता. तो टी२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त होईल अशी आशा होती आणि म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले होते. पण तो तंदुरुस्त होऊ शकला नाही आणि त्याची जागा स्टीव्ह स्मिथने घेतली.


अ‍ॅलेक्स वोल्शेंकने नामिबियाच्या संघात शिकोंगोची जागा घेतली आहे. २० वर्षीय या क्रिकेटपटूने आतापर्यंत फक्त पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २६ धावा केल्या आहेत आणि चार विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये अमेरिकेविरुद्ध पदार्पण केले होते. १२ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात शिकोंगोला उजव्या मांडीला दुखापत झाली होती. नामिबिया सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानविरुद्ध एक सामना शिल्लक आहे.


स्कॉटलंडने जलदगती गोलंदाज शरीफला कंबरेला दुखापत झाल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. १२ फेब्रुवारी रोजी सराव करताना त्याला ही दुखापत झाली. स्कॉटिश संघाने शरीफच्या जागी जॅक जार्विसला संघात घेतले आहे. जार्विस संघासोबत प्रवासी राखीव क्रिकेटपटू म्हणून होता. त्याने आतापर्यंत आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ११ विकेट्स घेतल्या आहेत. स्कॉटलंडचे अजूनही दोन गट सामने शिल्लक आहेत.

Comments
Add Comment

IPL 2026 : म्हणून श्रेयस अय्यरला भरावा लागणार २४ लाख रुपयांचा दंड

मुंबई : आयपीएल २०२६ च्या सातव्या सामन्यात, पंजाब किंग्सने (पीबीकेएस) चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) ५ गडी राखून

IPL 2026 : पंजाबची चेन्नईवर ५ विकेट्सने मात; आयुष म्हात्रेची झुंजार खेळी व्यर्थ

- सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव; घरच्या मैदानावर नामुष्की पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला पाच गडी राखून

यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला.

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर