मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या विजयामुळे अ गटातून पुढील फेरीसाठी (सुपर एट) भारत पात्र झाला आहे. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ७७ धावा करणारा ईशान किशन सामनावीर झाला.
मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. हार्दिक पांड्या कुलदीप यादववर चांगलाच भडकला होता.
नेमकं काय झालं?
मॅच संपवण्यासाठी सूर्यकुमार यादवने आपला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यावर पुन्हा विश्वास दर्शवला. हार्दिक पांड्याला 18 वी ओव्हर देण्यात आली होती. हार्दिक पंड्या या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीला बॉलिंग करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आफ्रिदीने एक हवेत शॉट मारला, जो सरळ कुलदीप यादवच्या दिशेने गेला. कुलदीपने तो सोपा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातातून बॉल निसटला आणि थेट बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडला. पाकिस्तानला यामुळे सहा रन्स मिळाले अन् हार्दिक भडकला.
🚨🚨Yesterday, Hardik Pandya and Kuldeep Yadav had a heated exchange after Kuldeep dropped a catch off Shaheen Afridi. Hardik was clearly unhappy with his reaction after the match, and his sharp reaction to Kuldeep was evident on the field. Kuldeep appeared upset by the… pic.twitter.com/KT8vPqYv7w
— Shanu (@Shanu_3010) February 16, 2026
हार्दिक भडकला सूर्यकुमारवर:
ओव्हरच्या दुसऱ्या बॉलनंतर हार्दिकने कुलदीपला यावेळी काहीच बोललं नाही. हार्दिक सूर्यकुमारवर भडकला. कुलदीपला थर्ड मॅनला ठेव, असं हार्दिकने सूर्याला सांगितलं. त्यानंतर सूर्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिकने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 11 वा खेळाडू असणाऱ्या उस्मान तारिकचा बोल्ड काढला अन् टीम इंडियाने मॅच जिंकली. मात्र, इथंच राडा सुरू झाला.







