मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या विजयामुळे अ गटातून पुढील फेरीसाठी (सुपर एट) भारत पात्र झाला आहे. भारताने अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान या तिन्ही संघांविरूद्धचे साखळी सामने जिंकले. आता भारताचा बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध साखळी सामना आहे. पण या सामन्याआधीच भारत सुपर एट फेरीसाठी पात्र झाला आहे.
प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने २० षटकांत सात बाद १७५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव १८ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकार मारत ७७ धावा करणारा ईशान किशन सामनावीर झाला. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग दुसरे अर्धशतक केले. याआधी ईशानने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात ६१ धावांचे योगदान दिले होते.
सोशल मीडियावर या सामन्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवणारे बरेच मीम्स व्हायरल झाले. खासकरुन बाबर आझमला टार्गेट करण्यात आलं. बाबर आझम पाकिस्तानचा महत्वाचा खेळाडू आहे. अनुभवी आहे. त्याच्याकडून टीमला बऱ्याच अपेक्षा होत्या. पण पाकिस्तानचा संघ संकटात असताना तो स्वस्तात बाद होऊन तंबूत परतला. त्यामुळे खासकरुन बाबर आझमला इंटरनेटवर लक्ष्य करण्यात आलं. संपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या खेळात कुठे समन्वयच दिसला नाही. गोलंदाजी असो वा फलंदाजी प्लानिंगचा अभाव स्पष्ट दिसत होता. कुठला बॅकअप प्लानच दिसत नव्हता.
Indian fans really did this in front of Pakistani people. Next level owning 😭 pic.twitter.com/fBMU0PFRRu
— R A T N I S H (@LoyalSachinFan) February 16, 2026
Broo this..🤯 Indian Celebrating infront of Pakistanis, Dubai. 🤣🔥 #INDvsPAK pic.twitter.com/EKR0gifTEC
— Wellu (@Wellutwt) February 15, 2026
Pakistani right now 😆😆😉 #INDvsPAK pic.twitter.com/beqCfCn5zy
— Anurag Chaturvedi (@anuragchturvedi) February 15, 2026
Jab angrezi nahi aati toh mat bolo😁. Why to be piece of mockery in front of all? Jaisa game waisi harkat 😂😂!#INDvsPAK #INDdefeatsPAK pic.twitter.com/w4Bc4nhVaG
— ARC (@Arc0001Armor) February 16, 2026
वर्ल्ड कपमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता भारतीय टीमने नेहमीच पाकिस्तानला हरवलं आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानचा डाव नेहमीच ढेपाळतो. कालच्या सामन्यातही हेच घडलं. पाकिस्तानची घसरण पहिल्या ओव्हरपासून सुरु झाली. हार्दिक पंड्याने साहीबझादा फरहानला शुन्यावर आऊट केलं. बुमराहच्या गोलंदाजीवर सॅम अयूबचा नशिबाने टॉप एज लागून एक सिक्स गेला. त्यानंतर परफेक्ट यॉर्करवर अयबूने तंबूची वाट धरली. या मॅचनंतर पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल झाले आहेत.







