नाशिक : नाशिक महापालिकेच्या सर्व स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना सादर करण्यात आली. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्यामुळे सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरांनी निवड झालेल्या सदस्यांच्या घोषणेची औपचारिकता केली आणि स्थायी समितीवर नव्या सदस्यांचे स्वागत केले.
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. या घोषणेनुसार नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाच्या अर्थात भाजपच्या नऊ जणांची तर शिवसेनेच्या चार जणांची, उबाठाच्या दोन जणांची आणि राष्ट्रवादीच्या एकाची निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली आहे तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना शिवसेनेकडून स्थायी समितीवर संधी मिळाली आहे.
नाशिक महापालिका स्थायी समिती सदस्य
- भाजप : माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप
- शिवसेना : मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे
- राष्ट्रवादी काँग्रेस : मुकेश शहाणे (अपक्ष)
- उबाठा : योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे
- मनसेच्या मयुरी पवार यांनी शिवसेना नगरसेवकांसोबत नोंदणी केल्यामुळे त्यांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळाली आहे.







