Wednesday, April 8, 2026

कोटक महिंद्रा बँकेकडून भारतातील परिवहन कर्मचाऱ्यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी ‘सेहत का सफर ४.०' लाँच

कोटक महिंद्रा बँकेकडून भारतातील परिवहन कर्मचाऱ्यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी ‘सेहत का सफर ४.०' लाँच

मुंबई : ड्रायव्‍हर आणि कुटुंबाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याला चालना देण्‍यासाठी भारतभरात ४५ आरोग्‍य व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले आहे. मुंबई, १२ फेब्रुवारी २०२६: कोटक महिंद्रा बँकेने ('केएमबीएल' / 'कोटक') आज आपल्‍या प्रमुख सीएसआर उपक्रमाचे चौथे एडिशन 'सेहत का सफर ४.०'च्‍या लाँचची घोषणा केली. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून भारतातील परिवहन समुदायासाठी प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य तपासणी सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. या उपक्रमामधून भारताच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला पुढे घेऊन जात असलेला आवश्‍यक, पण अनेकदा सेवांपासून वंचित राहिलेला कर्मचारीवर्ग म्‍हणजेच ट्रक ड्रायव्‍हर्स, ट्रान्‍सपोर्टर्स आणि त्‍यांच्‍या कुटुंबांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम ठेवण्‍याप्रती कोटकची स्थिर कटिबद्धता दिसून येते.

२०२२ मध्‍ये सुरू करण्‍यात आलेला उपक्रम 'सेहत का सफर' वर्षानुवर्षे सतत विस्‍तारित झाला आहे. गेल्‍या तीन एडिशन्‍समध्‍ये या उपक्रमाने देशातील ७५ हून अधिक शहरांमध्‍ये १२० हून अधिक आरोग्‍य शिबिरे आयेाजित केली आहेत, ज्‍यासह हा जवळपास १३,५०० ड्रायव्‍हर्सपर्यंत पोहोचला आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झालेले चौथे एडिशन ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहिले, जेथे भारतातील प्रमुख वाहतूक मार्गांवर ४५ हून अधिक आरोग्‍य व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले आहे. या एडिशनच्‍या माध्‍यमातून कोटक महिंद्रा बँकेचा जवळपास ४,५०० ट्रक ड्रायव्‍हर्स आणि त्‍यांच्‍या कुटुंबांना प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यसेवा देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यासह परिवहन परिसंस्‍थेमध्‍ये दीर्घकाळापर्यंत ड्रायव्‍हर्सचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याप्रती आणि आर्थिक स्थिरतेप्रती योगदान देता येईल. हा उपक्रम ट्रक ड्रायव्‍हर्स, ट्रान्‍सपोर्टर्स आणि त्‍यांच्‍या कुटुंबांसाठी प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यसेवा देण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहे. ओडिशा, आसाम, पश्चिम बंगला, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्‍यप्रदेश, पंजाब आणि इतर प्रमुख परिवहन केंद्रांमध्‍ये शिबिरे उभारण्‍यात आली आहेत.

''भारतातील लॉजिस्टिक्‍स क्षेत्र आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचे आधारस्‍तंभ आहे आणि या क्षेत्राची क्षमता परिवहन कर्मचाऱ्यांच्‍या आरोग्‍यावर अवलंबून आहे. सेहत का सफर ४.० च्‍या माध्‍यमातून कोटक महिंद्रा बँक आपली सामाजिक जबाबदारी वाढवत आहे, तसेच प्रत्‍यक्ष परिवहन केंद्रांना प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देत आहे. ज्‍यामुळे ड्रायव्‍हर्स आणि त्‍यांच्‍या कुटुंबांना आवश्‍यक आरोग्‍यसेवा मिळण्‍यास, आजारांचे लवकर निदान होण्‍यास आणि आरोग्‍यदायी, अधिक सुदृढ कर्मचारीवर्ग घडवण्‍यास मदत होत आहे, जे शाश्वत आर्थिक विकासाला चालना देतात,'' असे कोटक महिंद्रा बँकेच्‍या लॉजिस्टिक्‍स अँड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरचे अध्‍यक्ष अमित मोहन म्‍हणाले.

प्रत्‍येक सेहत का सफर ४.० शिबिरामध्‍ये पात्र डॉक्‍टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी आणि समुपदेशक आहेत, जे वैद्यकीय तपासणी करतात, आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याबाबत जागरूकता निर्माण करतात आणि ड्रायव्‍हर्सना प्रतिबंधात्‍मक केअर व उपलब्‍ध संबंधित सरकारी स्‍वास्‍थ्‍य योजनांबाबत मार्गदर्शन करतात. प्रमुख वाहतूक मार्ग आणि लॉजिस्टिक्‍स केंद्रांमध्‍ये शिबिरे उभारत हा उपक्रम लांब अंतरापर्यंत व आव्‍हानात्‍मक प्रवासामुळे ड्रायव्‍हर्सना मिळणाऱ्या मर्यादित आरोग्‍यसेवा सुविधांबाबत आव्‍हानांचे निराकरण करण्‍यास मदत करतो.

विस्‍तारित पोहोच आणि सुधारित निदानासह सेहत का सफर ४.० मधून भारतातील परिवहन कर्मचारीवर्गाचे आरोग्‍य अधिक उत्तम ठेवण्‍याप्रती कोटक महिंद्रा बँकेची स्थिर कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामुळे मजबूत, अधिक स्थिर लॉजिस्टिक्‍स परिसंस्‍थेला पाठिंबा मिळत आहे, जी देशाच्‍या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची आहे.

Comments
Add Comment