Monday, February 16, 2026

घराच्या गच्चीवर मोठा स्फोट, दोघांचा मृत्यू आणि दोन तरुणी जखमी

घराच्या गच्चीवर मोठा स्फोट, दोघांचा मृत्यू आणि दोन तरुणी जखमी

भुवनेश्वर : घराच्या गच्चीवर मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने भोवतालचा परिसर हादरला. अनेकजण भीतीने घरांबाहेर आले. काहींनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली घटनास्थळी पोहोचताच त्यांना धक्का बसला. गच्चीत रक्त वाहत होतं. एक माणूस जमिनीवर पडला होता आणि तीन महिला जखमी अवस्थेत होत्या. ज्यांनी हे दृश्य बघितलं ते क्षणभर हादरले. नंतर स्वतःला सावरत स्थानिकांनी गच्चीवर असलेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन जखमींपैकी पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. जखमी झालेल्या तीन महिलांपैकी एका महिलेचा काही तासांनंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर दोन जखमींवर उपचार सुरू आहे. स्फोट प्रकरणी पोलीस तपासाला सुरुवात झाली आहे. एनआयएनेही घटनेची दखल घेऊन स्वतंत्र तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशातील भुवनेश्वरमध्ये एअरफिल्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरपाडा आझाद नगर येथील एका घराच्या गच्चीवर चार जण क्रुड बॉम्ब अर्थात देशी बॉम्ब तयार करण्यात गुंतले होते. बॉम्ब निर्मितीत एक पुरुष आणि तीन महिला गुंतल्या होत्या. बॉम्बेची निर्मिती गुपचूप सुरू होती. कोणाला कळू नये यासाठी इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या ३ टाक्यांच्या आडोश्याला लपून बॉम्बेच्या निर्मितीचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना गडबड झाली आणि एका बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब निर्मितीसाठी आणलेल्या स्फोटकांना आग लागली. स्फोटकांच्या जवळच बसलेल्या चौघांच्या कपड्यांनी पेट घेतला.

गच्चीवर झालेल्या स्फोटामुळे २६ वर्षांच्या शहनवाझ मलिक नावाच्या पुरुषाचा मृत्यू झाला. काही तासांनंतर त्याच्या आईचा ५१ वर्षीय लिजातुन बीबीचा मृत्यू झाला. शहनवाझचं लग्न तृप्तीमयी महल नावाच्या तरुणीशी ठरलं होतं. ही २३ वर्षांची तरुणी आणि तिची २७ वर्षांची मोठी बहीण अमिया या दोघी जखमी झाल्या. सध्या रुग्णालयात तृप्तीमयी महल आणि अमिया महल या दोघींवर उपचार सुरू आहेत. तब्येत स्थिर झाल्यावर डॉक्टरांच्या परवानगीने तृप्तीमयी महल आणि अमिया महल यांची कसून चौकशी करणार असल्याचे सूतोवाच पोलिसांनी केले आहे.

शहनवाझ कोणत्या हेतूने बॉम्बेची निर्मिती करत होता हे अद्याप समजलेले नाही. बॉम्ब निर्मितीचा अतिरेकी कारवायांशी काही संबंध आहे का याचा तपास एनआयए करत आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरुन अनेक नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीतून प्रथमदर्शनी बॉम्बची निर्मिती योगिक हेक्साहायड्रो ट्रिनिट्रो ट्रायजीन नावाचा घटक वापरून केली जात होती, हे लक्षात आले आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार शहनवाझ मलिक याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन यांसह एकूण सात प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात गु्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच तो एका राजकीय वादातही सापडला होता. यामुळे बॉम्बनिर्मितीचा राजकीय वादाशी काही संबंध आहे का , याचाही तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >