मुंबई : जागतिक बाजारातील हालचाली आणि अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीचा प्रभाव देशांतर्गत सराफा बाजारावर स्पष्टपणे जाणवत आहे. १६ फेब्रुवारी रोजी देशात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५६,५२० रुपयांवर पोहोचला असून चांदीचा दर प्रति किलो २,४६,०६० रुपये इतका नोंदवला गेला आहे.
अमेरिकेतील महागाईचे आकडे, सकल देशांतर्गत उत्पादनाचे संकेत आणि मध्यवर्ती बँकेच्या धोरणांवर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती औंसमागे ५,००० डॉलरच्या पुढे गेल्यानंतर नफा वसुली झाल्याने दरात काहीशी चढ-उतार स्थिती दिसून आली. डॉलर निर्देशांक आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांची खरेदी यांचाही दरांवर परिणाम होत आहे.
शहरनिहाय सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई – १,५६,२४० रुपये दिल्ली – १,५५,९७० रुपये कोलकाता – १,५६,०३० रुपये चेन्नई – १,५६,६९० रुपये हैदराबाद – १,५६,४९० रुपये बंगळुरू – १,५६,३६० रुपये
दक्षिणेकडील बाजारपेठांमध्ये किंमती तुलनेने उच्च पातळीवर असल्याचे दिसून आले आहे.
शहरनिहाय चांदीचे दर (प्रति किलो)
मुंबई – २,४५,६१० रुपये दिल्ली – २,४५,१९० रुपये कोलकाता – २,४५,२८० रुपये चेन्नई – २,४६,३२० रुपये हैदराबाद – २,४६,००० रुपये बंगळुरू – २,४५,८०० रुपये
चांदीतही प्रमुख शहरांमध्ये दरात किरकोळ फरक आढळून आला आहे.
नागपूर बाजारातील दर सोन्याचा विक्री भाव
९९.५ टक्के शुद्धता – १,५६,९०० रुपये २२ कॅरेट – १,४५,९०० रुपये १८ कॅरेट – १,२०,८०० रुपये १४ कॅरेट – ९४,९०० रुपये ९ कॅरेट – ६२,८०० रुपये
सोन्याचा खरेदी भाव
९९.५ टक्के शुद्धता – १,५२,२०० रुपये २२ कॅरेट – १,४१,५०० रुपये १८ कॅरेट – १,१७,२०० रुपये १४ कॅरेट – ९१,१०० रुपये ९ कॅरेट – ५९,७०० रुपये
चांदीचा विक्री भाव
बुलियन व नाणी/बार – २,४८,४०० रुपये दागिने – २,४५,९०० रुपये
चांदीचा खरेदी भाव
बुलियन व नाणी/बार – २,४०,९०० रुपये दागिने – २,३८,५०० रुपये
सराफा बाजारातील ही तेजी कायम राहणार की दरात सुधारणा होणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तर तज्ञांच्या म्हणत आहेत की आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींवर पुढील दिशानिर्देश अवलंबून असतील.







