Bigg Boss Marathi 6 : तुझ्या आईची...'; तू मला नॉमिनेट करतो! बिग बॉसच्या घराबाहेर दोन स्पर्धकांमध्ये मारामारी ? VIDEO व्हायरल

मुंबई : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही स्पर्धकांमधील वाद निवळण्याचं नाव घेत नाहीयेत. नुकतेच स्ट्रॉंग स्पर्धक मानले जाणारे आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर पडले, तर आठवड्याभरापूर्वी ओमकार राऊतचं एलिमिनेशन झालं होतं. मात्र, आता हे स्पर्धक घराबाहेर येताच त्यांच्यात भररस्त्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, यामध्ये ओमकार राऊत चक्क आयुष संजीवच्या अंगावर धावून जाताना दिसतोय. "मला नॉमिनेट करतोस का रे!" असं म्हणत ओमकारने आयुषला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळतंय. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून, हा वाद खरा आहे की केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.





व्हायरल व्हिडिओमधलं कारण आलं समोर...



सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी'च्या दोन स्पर्धकांमधील ज्या हाणामारीची चर्चा रंगली आहे, त्यामागचं रंजक सत्य आता समोर आलं आहे. खरं तर, हा कोणताही खरा वाद नसून सोशल मीडिया स्टार निक शिंदे यांनी बनवलेलं एक मजेशीर रील आहे. या व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले आयुष संजीव आणि ओमकार राऊत चक्क एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसतात. बिग बॉसच्या घरात एकमेकांना नॉमिनेट केल्याचा राग काढत हे दोन्ही स्पर्धक एकमेकांच्या अंगावर धावून जातात, असं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. अनेक कंटेंट क्रिएटर बिग बॉसवर रील बनवत असतात, पण निक शिंदे यांनी थेट मूळ स्पर्धकांना घेऊनच हे रील बनवल्याने चाहते संभ्रमात पडले होते. मात्र, हा केवळ मनोरंजनाचा एक भाग असून खेळातील स्पर्धा खेळाबाहेर किती गमतीशीर असू शकते, हेच यातून मांडण्यात आलं आहे.



सोशल मीडियावर रीलचा राडा


सोशल मीडियावर सध्या बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्यातील 'राड्या'मुळे चाहते अवाक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर निक शिंदे आणि त्याचे मित्र टीव्हीवर 'भाऊचा धक्का' बघत असताना, घरातून कोण बाहेर पडणार याची चर्चा करत असतात. तेवढ्यात अचानक आयुष संजीव तिथे एन्ट्री देतो, ज्याला बघून मित्रांची घाबरगुंडी उडते. पण ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा दुसऱ्या बाजूने ओमकार राऊत तिथे येतो आणि "मला नॉमिनेट करतो का रे!" असं ओरडत थेट आयुषची कॉलर पकडतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांना वाटलं की त्यांच्यात खरंच हाणामारी झाली आहे, मात्र सत्य काही वेगळंच आहे. हा कोणताही खरा वाद नसून निक शिंदे यांनी बनवलेलं एक मजेशीर रील आहे. घरामध्ये नॉमिनेशनवरून कितीही मतभेद असले, तरी घराबाहेर ओमकार आणि आयुषमध्ये घट्ट मैत्री आहे. केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि बिग बॉसची क्रेझ कॅश करण्यासाठी त्यांनी हा विनोदी व्हिडिओ बनवला आहे.

Comments
Add Comment

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका