मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैंकी सुधार आणि बेस्ट समितीही शिवसेनेच्या वाट्याला आल्या असून सुधार समिती अध्यक्षपदी अमेय घोले आणि बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून अनुक्रमे अमेय घोले आणि तृष्णा विश्वासराव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव यांची वर्णी लागल्यास बेस्टच्या पहिल्या अध्यक्ष त्या ठरल्या जाणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या सुधार समिती आणि बेस्ट समिती सदस्यपदाची नावे महापौर रितू तावडे यांनी सभागृहात जाहीर केली. भाजपकडून सुधार समितीत तेजस्वी घोसाळकर, चंदन शर्मा यांना संधी दिली आहे. यापूर्वीचे भाजपचे या समिती वर सदस्य कायम ठेवले आहे. तर शिवसेनेकडून संध्या दोशी आणि अजित रावराणे यांनाही संधी देण्यात आली आहे. तर बेस्ट समितीमध्ये भाजपकडून आकाश पुरोहितसह संतोष मेढेकर, अजय सिंग,रमाकांत गुप्ता यांना संधी देण्यात आली आहे तर शिवसेनेने उपेंद्र सावंत आणि तृष्णा विश्वासराव यांची नियुुक्ती केली आहे.
सुधार समिती :
भाजप: प्रकाश गंगाधरे,अलका केरकर, शर्मा चंदन , महादेव शिवगण, दिपक (बाळा) तावडे, स्वप्ना म्हात्रे, अनिष मकवानी, तेजस्वी घोसाळकर,साक्षी दळवी,संदिप पटेल
शिवसेना: अमेय घोले,संध्या दोशी, किरण लांडगे, अजित रावराणे,
उबाठा: विशाखा राऊत,सचिन पडवळ, रोना रावत, विठ्ठल लोकरे, जितेंद्र वळवी, मिलिंद वैद्य, उर्मिला पांचाळ
काँग्रेस: अश्रफ आझमी, राजा रहेबर खान,मेहेर हैदर
मनसे : सुप्रिया दळवी
एमआयएम : शबाना शेख
बेस्ट समिती :
भाजप: आकाश पुरोहित, सुनिल गणाचार्य, संतोष मेढेकर ,अजय सिंग ,प्रमोद वाकोडे, रमाकांत गुप्ता
शिवसेना: तृष्णा विश्वासराव, उपेंद्र सावंत
उबाठा: प्रविणा मोरजकर, सुनील अहिर, नितीन नांदगावकर, सचिन पाटील, सुनील मोरे
काँग्रेस:आशा कोपरकर, चंद्रकांत मचीगर
एमआयएम : फैसल खान







