Saturday, February 14, 2026

साप्ताहिक राशिभविष्य , १५ ते २१ फेब्रुवारी २०२६

साप्ताहिक राशिभविष्य , १५  ते २१  फेब्रुवारी २०२६

साप्ताहिक राशिभविष्य, १५ ते २१ फेब्रुवारी २०२६

परदेशगमनाचे योग आहेत

मेष : या आठवड्यात शुभ ग्रहांची साथ मिळाल्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांना अनुकूल फळे प्रतिपादित होतील. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे योग आहेत.  मात्र  प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता राहील. कुटुंबातून तसेच  गुरुतुल्य व्यक्तींकडून मार्गदर्शन व मदत मिळेल. नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन  प्रशंसेस पात्र  ठराल. एखादी महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. स्पर्धकांवर मात करता येईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे भाग्योदय होतील. मंगल  कार्य  ठरेल.    

अनेकानेक मार्गांनी धन आगमन

वृषभ : अनेकानेक मार्गानी  धन आगमन  होईल. गुंतवणूक भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल मात्र नवीन गुंतवणूक करताना जाहिरातींना  तसेच इतरांच्या गोड बोलण्याला  फसू  नका. त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या सल्ला अवश्य घ्या. जमीन जुमला, मालमत्तेचे व्यवहार इत्यादी मधून मोठे आर्थिक लाभ होतील. ओळखी मध्यस्ती फलद्रूप होतील. एखादे रखडलेले महत्त्वाचे काम तसेच सरकारी काम सुद्धा सफल होईल. मोठ्या राजकीय व्यक्तींच्या ओळखीतून लाभ होतील. प्रवाही ग्रहमान असल्यामुळे वेगाने घटना घडतील

मनासारख्या घटना घटित होतील   

मिथुन : नोकरीधंद्यात शुभ फळे मिळतील. मनासारख्या घटना घटित होतील. नोकरीतील राजकारण संपेल. वरिष्ठांची मर्जी राहील तसेच हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय-धंद्यात नवीन करार मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येतील. व्यवसायात केलेले बदल सकारात्मक ठरतील. कोणत्याही प्रकारच्या खरेदी-विक्री मध्ये सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सावधानता बाळगा. कोणत्याही प्रकारचे लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे. वादग्रस्त येणे वसूल होईल. शांतपणे निर्णय घेणे आवश्यक ठरेल. कुटुंबात जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. वैवाहिक सुख लाभेल. विवाह सारख्या समारंभांना उपस्थित  रहाल. परदेशी संधान यशस्वी होईल.

स्वप्न साकार होईल

कर्क : कुटुंबातील मुला-मुलींच्या प्रगतीच्या वार्ता कानी येतील. त्यांचे नोकरीविषयक असलेले प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील. कॉलेज कॅम्पस मधून नोकरी नक्की होईल. परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होईल पण  त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक. प्रामाणिक प्रयत्नांची गरज राहील. अचानक खर्च करावा लागेल. परंतु मदत उपलब्ध होईल. कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.  रागावर नियंत्रण हवे.प्रवासाचे योग आहेत पण प्रवासामध्ये जपून रहावे वाहना च्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसऱ्या वाहनांबरोबर स्पर्धा नको.

मदत मिळेल

सिंह : काही महत्त्वाची कामे रखडलेली होती व ती पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करीत होता अशा स्वरूपाची कामे या कालावधीत हातावेगळी करता येतील. या कामात आपल्याला मदत मिळेल. व्यवसाय धंद्यात काही नवीन घटना घडतील त्या व्यवसायात पोषकच ठरतील. व्यवसायाचे स्वरूप बदलू शकते त्याचप्रमाणे व्यवसाय विस्ताराचा विचार करू शकाल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळेल. वादग्रस्त येणी येतील आर्थिक परिस्थिती मजबूत राहील विशेषतः ज्यांचे परदेशी व्यापार आहेत अशांचे काही नवीन करारमदार होऊ शकतात. व्यावसायिक  जुने संबंध  नव्याने प्रस्थापित होऊ शकतात.

प्रयत्नात कमी पडू देऊ नका

कन्या : दीर्घकालीन रखडलेली कामे पूर्ण होतील परंतु प्रयत्नात कमी पडू देऊ नका आळस झटका. स्वतःचे काम स्वतः करा इतरांवर कोणतेही काम सोपवू नका शुभ ग्रहमानाचा फायदा करून घ्या. व्यवसाय धंद्यात उलाढाल वाढेल आपल्या उत्पादनाला सतत मागणी राहील. त्यामुळे उत्साह व आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील योग्य  जीवन साथी निवडता येईल. आर्थिक चिंता मिटतील सहकुटुंब सहपरिवार सहलीचा आनंद लुटाल. त्याचप्रमाणे आपल्या मित्र मंडळ यांच्या समवेत मनोरंजन करण्यासाठी खर्च कराल  

यश दायक परिस्थिती निर्माण होईल

तूळ : व्यवसाय-धंद्यातील दीर्घकाळ रखडलेली येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील, तसेच व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. व्यवसायात केलेले बदल सकारात्मक परिणाम घडवून आणतील. मात्र महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. शांतपणे निर्णय घ्या. संयम बाळगा. आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करून निर्णय घ्या. कुटुंबात आपल्या जोडीदाराचे मत विचारात घ्या. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे मत अथवा विचार महत्त्वाचा ठरेल. प्रवास करावे लागतील; परंतु प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे.

ताणतणाव संपुष्टात येईल.  

वृश्चिक : व्यवसाय धंद्यात अथवा नोकरीत  वातावरण अनुकूलतेने भरलेले राहील. आत्तापर्यंत नोकरीत अथवा आपल्या कार्यक्षेत्रात आलेला ताणतणाव संपुष्टात येईल. काही व्यवसायासाठी असलेले सकारात्मक बदल व्यवसायास पोषक ठरतील. भागीदारी व्यवसायात व्यवसाय विस्ताराचे नियोजन करता येईल. नवीन उत्पादनाविषयी सकारात्मक हालचाली होतील तसेच व्यवसायिक जागेचे नियोजन करता येईल नोकरीमध्ये राजकारण आणि गटबाजी संपून आपण केलेल्या कार्याचा गौरव होईल वरिष्ठांचे तसेच हाताखाली लोकांचे सहकार्य अपेक्षित असलेले मिळत राहील परदेशी जाण्याचा योग आहे.  

फायद्याचे सौदे हाती येतील

धनु : शुभ ग्रहांच्या शुभ योगाचा वरचष्मा या सप्ताहात राहील. स्वतंत्र व्यवसायिक आपल्या व्यवसाय धंद्यात चांगले यश मिळवू शकतील. ज्यांचा व्यवसाय प्रदेशाची संबंधित आहे विशेषतः अशा व्यवसायात आर्थिक फायदे मिळतील. परदेशवारी ची पण शक्यता राहील. काही दीर्घकालीन फायद्याचे सौदे हाती येतील पूर्वी केलेले व्यवसायिक नियोजन सफल होताना दिसेल त्यामुळे केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील. व्यवसायिक उलाढाल वाढेल नफ्याचे प्रमाणात चांगली वाढ झालेली जाणवेल. आपण जर स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न बघत असाल तर त्या दृष्टीने केलेले प्रयत्न सफल होतील.

वाद-विवाद संपतील

मकर : गेल्या काही दिवसात आपल्याला कोणत्यातरी गोष्टीतून  त्रास अथवा मनस्ताप होत होता अशा समस्या सुटतील. तोडगा हाती येईल. राहत्या घराविषयी चे प्रश्न सुटून स्वतःच्या घरात राहता येईल. वाद-विवाद संपतील. वडिलोपार्जित संपत्ती विषयी असलेले मतभेद संपुष्टात येतील सर्वमान्य तोडगा निघेल. आप्तेष्ट, भावंड यांच्याबरोबर असलेले मतभेद अथवा वाद-विवाद संपून नाती सुधारतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीचे बोलावणे येऊ शकते. चालू नोकरी मधील परिस्थिती तीच राहिली तरी नव्या नोकरी विषयीचे विचार डोक्यात येऊ शकतात.   

आत्मविश्वासात वृद्धी होईल

कुंभ : आत्तापर्यंत आलेली मरगळ दूर होऊन उत्साह वाटेल आत्मविश्वासात वृद्धी होईल आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल नवीन कामे हातात घ्याल. बदलत्या  ग्रह मानानुसार, बदलत्या परिस्थितीचा फायदा मिळेल. महत्त्वाची कामे हातावेगळी करून घ्या त्यामध्ये टंगळमंगळ करू नका. इतरांवर कामाच्या बाबतीत अवलंबून राहणे चुकीचे ठरेल. महत्त्वाच्या बाबीत यशाचे प्रमाण वाढते राहील मात्र योग्य वेळेस योग्य निर्णय शांतपणे घ्या. स्वतःच्या मताला किंवा आपल्या आवाजा चे ऐका. व्यवसायात नवीन योजना सफल होईल वैयक्तिक उत्सव समारंभ  होतील. हातात घेतलेले प्रत्येक काम यशस्वी होईल.

मुलाखती यशस्वी ठरतील

मीन : कुटुंबातील तरुण-तरुणींचे समस्या अथवा प्रश्न सुटतील. तसेच विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह ठरतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरू शकतात. आत्तापर्यंत चे प्रेमप्रकरण विवाहासारख्या पवित्र बंधनात   बांधले जाईल. मनासारखा जीवनसाथी मिळू शकतो. नोकरीविषयक समस्या संपुष्टात येऊन नोकरी मिळेल नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी ठरतील. ओळखी मध्यस्ती मुळे महत्त्वाची कामे पार पाडता  येतील. व्यवसाय-धंद्यात परिस्थिती सुधारत जाईल. केलेले नियोजन सफल होताना दिसेल बहुतांश गोष्टीत सफलता हाती येईल. व्यवसायाची आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. 
Comments
Add Comment