Monday, February 16, 2026

IND vs PAK Match : सामन्यापूर्वी मोठी बातमी; ICC Men's T20 World Cup मधून नेपाळच पॅकअप

IND vs PAK Match : सामन्यापूर्वी मोठी बातमी; ICC Men's T20 World Cup मधून नेपाळच पॅकअप

मुंबई : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ च्या शर्यतीला वेग आला असतानाच एक संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. ग्रुप C मधील सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार विजय नोंदवत पुढील फेरीत प्रवेश जवळपास निश्चित केला, तर नेपाळ क्रिकेट टीमचा प्रवास इथेच संपला.

नेपाळने साखळीतील तिन्ही सामने गमावल्याने त्यांच्याकडे एकही गुण उरलेला नाही. त्यामुळे नकारात्मक नेट रनरेटमुळे सुपर ८मध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे ते स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नेपाळने २० षटकांत १३३ धावा केल्या. दीपेंद्र सिंग ऐरीने अर्धशतक झळकावले, तर सोमपाल कामीने झटपट धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत १६व्या षटकातच सामना आपल्या नावावर केला. शाई होप आणि हेटमायर यांनी महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर जेसन होल्डरने गोलंदाजीत चमक दाखवली.

दरम्यान, ग्रुप सीमध्ये वेस्ट इंडिज आघाडीवर असून इंग्लंडचाही सुपर ८ मधील मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच स्पर्धेतील समीकरणे बदलल्याने पुढील सामने अधिक रोमांचक होणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >