Saturday, February 14, 2026

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे. पुण्यात विविध भागात शंकरांची प्राचीन मंदिर आहेत या मंदिरांना भेट देण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीचा विचार करूनच पुणे महानगरपालिकेने जादा बसेस चे नियोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा प्रवास हा सुखकर आणि वेळेवर व्हावा यासाठी महामंडळाने अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच स्वारगेट ते नीलकंठेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी मुख्य स्थानकांवरून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

नियोजित बस फेऱ्या

पहिली फेरी पहाटे साडेतीन वाजता असून नियमित मार्ग असलेला स्वारगेट - पानशेत/ वरसगाव या मार्गावर १४ बसेस सोडण्यात आल्या आहेत, तसेच कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी कात्रज सर्पोद्यान येथून बससेवा आहे.

पहिली फेरी पहाटे साडेपाच वाजता असून दर २० मिनिटांनी बस सोडण्यात येणार आहे. याशिवाय कात्रज - सारोळामार्गे कापूरहोळ, कात्रज- सासवडमार्गे, बालाजींमार्गे मंदिर केतकावळे, कात्रज रायगड, कात्रज - वांगणीवाडी या बस या मार्गावरून जाणार आहेत.

घोराडेश्वर येथे निगडीवरून बस

निगडी (पवळे चौक ) ते घोराडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) घोराडेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी निगडी येथून बससेवा उपलब्ध आहे. या ठिकाणानावरून पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी पहिली बस सुटेल. याशिवाय मार्ग क्रमांक २२८, ३०५, ३३२, ३४१, ३४२, ३६८, ३७१ या क्रमांकाच्या बस या मार्गावरून जातात. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment