चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे जर-तरवर चर्चा करण्यात अर्थ नाही; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

मुंबई : विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तरवर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.


शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, ‘दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रि‍करणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो आहे असं चित्र निर्माण केलं जात आहे. आमच्याकडून यासाठी गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर त्यांचीच चर्चा सुरू झाली. त्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. त्यानंतर आम्ही कधीच बोललेला नाही. आम्ही एवढंच म्हणालो की दादांची ही इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचं नाही हे आम्ही ठरवलं आहे,असे शशिकांत शिंदे यांनी बोलताना म्हटले आहे.


प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या विलीनीकरणाला विरोध दिसून येतोय का? याबाबतच्या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘या बाबतीत मी काही बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करून पक्ष उभा करण्याची भूमिका घेत आहोत. त्यामुळे याबाबत त्यांची काय भूमिका आहे हे मी सांगणं योग्य ठरणार नाही असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले.


पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की,राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने काम करण्याची भूमिका घेतोय. त्यामुळे विलीनीकरणावर मी बोलणार नाही. अजितदादांची चूक झाली आहे असं मी म्हटलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. अजित दादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाबाबत दुरुस्ती करायची होती. अजितदादा भावनिक होते. आदरणीय शरद पवार साहेबांच्या भेटीतही अजितदादांनी कधीच नजरानजर केली नाही,याबाबत काय निर्णय घ्यायचा हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होतं. त्यांच्या मनात काय होतं, माझ्या मनात काय होतं हे आता गेल्यानंतर सांगणं योग्य नाही.असेही शशिकांत शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत