Friday, February 13, 2026

Stock Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण, एका झटक्यात सात लाख कोटींचे नुकसान

Stock Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण, एका झटक्यात सात लाख कोटींचे नुकसान

मुंबई : AI चे वाढते महत्त्व, अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वाढत असलेले सोन्याचांदीचे महत्त्व यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक बड्या कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी घसरण झाली. आयटी कंपन्यांचे शेअर आपटले. या घडामोडींचा एकत्रित परिणाम दिसून आला. मुंबईचा शेअर बाजार अर्था बीएसई आणि निफ्टी फिफ्टी अर्थात राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्हीत घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स ८२,७२६.७६ वर बंद झाला. घसरणीमुळे बीएसई सेन्सेक्स १०४८.१६ अंशांनी अर्थात सुमारे सव्व्या टक्यांची घसरण झाली.

निफ्टी 50 मध्ये बीएसई सेन्सेक्स प्रमाणेच घसरण झाली. दिवसअखेर निफ्टी 50 हा २५,४७१.१० वर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये ३३६.१० अंशांनी अंशांनी अर्थात सुमारे १.३० टक्क्यांची घसरण झाली. बॅक निफ्टी ५५३ अंशांनी घसरला. सुरुवातीला आयटी शेअरच्या दरांमध्ये घसरण झाली. हळू हळू इतर उद्योग क्षेत्रांतील शेअरमध्येही घसरण झाली. मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री झाली.

बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी, बजाज फायनान्स आणि एसबीआय वगळता सर्व शेअर्स तोट्यात गेले आणि बंद झाले. सेन्सेक्समधील २८ शेअरना मोठा मोठा तोटा झाला. हिंदुस्तान युनिलिव्हर, इटरनल, टायटन, टाटा स्टील आणि टीसीएसमध्ये सर्वात जास्त घसरण झाली, जवळजवळ ५% घसरण झाली. आयटी व्यतिरिक्त, धातू, ग्राहक उत्पादने, रिअल इस्टेट, ऊर्जा, बँकिंग आणि वित्तीय सेवांनीही घसरणीला हातभार लावला. यावरून स्पष्ट होते की ही घसरण व्यापक होती.

'एआय'च्या प्रगतीमुळे आयटी कंपन्यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आयटी क्षेत्राची तांत्रिक प्रगती होईल पण रोजगारांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळेच आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी बीएसई मार्केट कॅप ४७२.४८ लाख कोटी होता, जो ६.८३ लाख कोटींनी घसरून ४६५.३१ लाख कोटींवर आला. एका अहवालानुसार, तीन दिवसांत अंदाजे ९० लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment