मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच धुराचे मोठे लोट संपूर्ण परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काहींनी तातडीने जिन्यांचा वापर करून खाली धाव घेतली तर काहींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. सुरक्षारक्षक आणि स्थानिक नागरिकांनीही मदतकार्याला हातभार लावला.
आग लागण्यामागचं कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
गोकुळधाम येथील ४५ मजली डीबी वुड इमारतीच्या ९ व्या मजल्यावर भीषण आग . .#prahaarnewsline #mumbai #fire #goregaon pic.twitter.com/V0zVO1fZl9
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) February 13, 2026







