Friday, February 13, 2026

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून 'काहीतरी वेगळे' असं म्हंटल होतं. त्यामुळे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच वातावरणात प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो. अशातच नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे एकमेकांच्या प्रेमात आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

मात्र नम्रता आणि तुषार यंदाच्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने ‘काहीतरी वेगळे’ प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या दोघांचं एक ‘काहीतरी वेगळे’ हे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. या दोघांची जोडी खूपच उत्तम दिसत असून, चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हे गाणं केवळ एका जोडप्याची कथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचा आरसा दाखवणारं हे गाणं आहे. आपण खरंच क्षण जगतोय… की फक्त त्यांना पोस्ट करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न हे गाणं प्रभावीपणे अधोरेखित करतं. युथफूल आणि भावस्पर्शी असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साकारलेल्या या गाण्याचं संगीत दिग्दर्शन, लिरीक्स आरोह कांगो यांनी केलं असून, देव आहिरराव आणि साक्षी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >