PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ) पत्ता बदलणार आहेत. तब्बल ७८ वर्षांनंतर पीएमओचं ऑफिस स्थलांतरित करण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार साउथ ब्लॉकमधून 'सेवा तीर्थ' नावाच्या नवीन बांधलेल्या इमारतीत हे ऑफिस हलवण्यात येणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी रायसिना हिलवरील एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या नवीन संकुलात जातील.


मिळालेल्या माहितीनुसार; मागील ५ दशकांपासून सरकारच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयाचं केंद्र राहिलेले साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांचे कार्यालय आता ब्रिटीश कालीन इमारतीतून नव्या सेवा तीर्थ येथे शिफ्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी साऊथ ब्लॉकमध्ये होणाऱ्या कार्यालयात अखेरची कॅबिनेट बैठक घेतील. त्यानंतर नव्या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन करण्यात येईल. रायसीना हिलजवळ नवी प्रशस्त इमारत साऊथ ब्लॉकपासून काहीच अंतरावर आहे.


या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान साऊथ ब्लॉकपासून सेवा तीर्थला जातील. जिथे पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे कार्यालय आणि इंडिया हाऊस आहे. इंडिया हाऊसमध्ये उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा पाहुणचार करण्यासाठी बनवलेले नवीन ठिकाण आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात पहिली कॅबिनेट बैठक साऊथ ब्लॉकमध्येच झाली होती.

Comments
Add Comment

Cockroach Janata Party : सीजेपी आंदोलकांवर 'जास्तीत जास्त संयम आणि किमान बळाचा' वापर

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप