Wednesday, February 11, 2026

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल दिसून येत आहे. हिवाळी थंड आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली असून दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. ११ फेब्रुवारी रोजी राज्यभर हवामान कोरडे राहणार आहे. तसेच सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णता जाणवेल. चला तर मग आजचं हवामान अपडेट जाणून घेऊयात.

आज मुंबईसह परिसरात थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. सकाळी फारसा गारवा जाणवणार नाही आणि दुपारी उकाडा जाणवेल. हवामान कोरडे आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे ३२ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसात ही उष्णतेची तीव्रता अशीच राहणार आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये सकाळी थोडा गारवा जाणवेल, मात्र दुपारी सूर्यप्रकाशामुळे वातावरण चांगलेच तापलेले राहील. मंगळवारच्या तुलनेत आज तापमान अधिक राहील. कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सअसदरम्यान आणि किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसदरम्यान असेल. एकंदरीत हवामान कोरडे आणि उबदार राहील.

मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता अधिक जाणवेल. ग्रामीण भागात सकाळी सौम्य गारवा असेल, पण दुपारच्या वेळेत उकाडा वाढलेला राहील. कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान तर किमान तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. हवामान पूर्णपणे कोरडे राहील. एकंदरीत १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे, निरभ्र आणि उष्ण राहील. थंडीचा प्रभाव आता फारसा उरलेला नाही. मंगळवारच्या तुलनेत आज तापमान जास्त राहील आणि पुढील काही दिवसांतही उष्णतेतील वाढ कायम राहील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >