Wednesday, February 11, 2026

पदपथ अतिक्रमण मुक्त, बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवणार - नवनियुक्त महापौरांचा निर्धार पक्का

पदपथ अतिक्रमण मुक्त, बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवणार - नवनियुक्त महापौरांचा निर्धार पक्का

मुंबई: मुंबईतील रोहिंग्या आणि बेकायदेशीर बांग्लादेशींना मुंबईतून हटवणे हेच आमचे महत्वाचे उद्दिष्ट असे. डिजिटल सिस्टीम आणि एआयचा वापर करून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्याकरता प्राधान्य दिले जाईल तसेच मुंबईमध्ये विविध ठिकाणी पदपथांवर अनिधकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांग्लादेशींचे जात प्रमाणपत्र व बोगस आधारकार्ड शोधून त्यावर त्वरीत कारवाई करून त्यांना पोलिसांच्य हवाली करण्यात येईल. त्यामुळे महापौर हे सभागृहात खुर्चीवर बसवणारे नसणार तर जनतेमध्ये सहभागी होवून महापौर म्हणून काम करणार असे नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी स्प्ष्ट केले. तसेच ही पदपथ अतिक्रमणमुक्तीच्या दिशेने पहिली बैठक महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने संयुक्तपणे घेवून यावरील कारवाईला गती देणार असल्याचेही तावडे यांनी आपल्या भाषणासह पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सभागृहात भाषण केल्यानंतर प्रथेप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात येत आपला सत्कार स्वीकारला. याप्रसंगी माध्यमांशी बोलतांना महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच असेल असे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी माझ्या रुपात मराठीच महापौर दिला आहे. सन २०१४च्या पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई आपण पाहतच आहोत. त्यामुळे स २०१४नंतर मुंबई गतिशील बनली असून पुढेही ती अधिक गतिशिल केली जाणार आहे. सभागृह हे निपक्षपातीपणे चालवले जाणार असून गोंधळ न घालता जर विरोधक कामकाजात भाग घेत असतील तर त्यांच्या चांगल्या सूचनाही विचार केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील प्रदुषित वातावरणाबाबत सहकाऱ्यांशी चर्चा तसेच त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल. मी स्वत: संवेदनशील महापौर असून महिला म्हणून महिलांसाठीची कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. एवढेच नाहीतर महापौरांपर्यंत जनतेला जाण्याची गरज नसून हा महापौर जनतेपर्यंत जाणारा आहे,असेही स्पष्ट केले. मुंबईतील घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे एम्सच्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न राहिल.

मुंबईकरांवरील पाणी दरवाढ रोखणार, टँकर माफिया फ्री

दरवर्षी होणाऱ्या ८ टक्के पाणी दरवाढीला स्थगिती देवून पाण्याचा दर स्थिर ठेवण्याकरता मी प्रयत्न करेन तसेच मुंबईमध्ये टँकर माफियांचे वाढलेले प्रस्थ व त्यांची मक्तेदारी बंद करण्याकरता टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवण्यात येईल. नवीन इमारतींप्रमाणे जुन्या इमारतींनाही रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु करण्यासाठी नगरसेवक निधी किंवा विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करून हे प्रकल्प राबवण्यात येतील.

आरोग्याच्या प्रश्नाकडे महापौरांचा अधिक कल

महापालिका रुग्णालयांचा दर्जा एम्सच्या धर्तीव सुधारण्याकरता तसेच प्रत्येकी प्रशासकीय विभागात डायलिसीस सेंटर आणि केमोथेरेफी सेंटर उभारण्याचा तसेच ज्येष्ठ नागरिकांना माहपालिकेच्या रुग्णालयात वर्षातून एकदा पूर्ण शरीत तपासणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय ह्दयविकाराच्या रुग्णांसाठी समर्पित रुग्णालयांमध्ये अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल असाही पूर्णपणे प्रयत्न केला जाईल.

महापौरांनी केले व्हर्च्युअल क्लासरुमचे कौतूक

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रशासनाने उचलावित असे आवाहन करतच रितू तावडे यांनी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरुम योजना सुरु करण्यात आली आहे. ती अत्यंत प्रशासनीय आहे. ही योजना अधिकाधिक विस्तारीत करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल याकरता मी प्राधान्य देणार असल्याचे सांगत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी राबवलेल्या योजनेचे कौतुक केले.

महापौर निधी ५० हजारांपर्यंत वाढवणार

मुंबई महापालिकेच्यावतीने महापौर निधी गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महापौर निधीमध्ये अधिक वाढ केली जाणार असून यासाठी भविष्यात महापौरांना पुष्पगुच्छ तसेच शाल श्रीफळ न देता यासाठीचे पैसै महापौर निधीला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून या महापौर निधीतून गरीब रुग्णांना अधिकाधिक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट करत महापौर निधीला सढळ हस्ते मदत करावी असेही आवाहन नवनिर्वाचित महापौरांनी केली.

महापौरांना दिल्या शुभेच्छा

महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, आमदार प्रविण दरेकर,माजी खासदार आणि शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, आमदार संजय उपाध्याय, योगेश सागर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांच्यासह अनेकांनी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय उपाध्याय यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Comments
Add Comment