Wednesday, February 11, 2026

द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानची झुंज अपयशी

द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानची झुंज अपयशी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय आणि चित्तथरारक सामना पाहायला मिळाला. टी-२० विश्वचषक २०२६ मधील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 'डबल सुपर ओव्हर'मध्ये पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी १८-१८ धावा केल्याने सामना पुन्हा टाय झाला. त्यानंतर दुसरी ओव्हर खेळवली गेली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना रहमानुल्ला गुरबाज झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात दोन वेळा सुपर ओव्हर खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

फॉर्मात असलेल्या एडन मार्करमनला (५) स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर अफगाणिस्तानी आनंदात होती. पण, क्विंटन डी कॉक व रायन रिकेल्टनच्या ११२ धावांच्या भागीदारीने सामना आफ्रिकेच्या बाजूने फिरवला. राशिद खानने १३ व्या षटकात मॅच पुन्हा अफगाणिस्तानच्या बाजूने झुकवली. त्याने दोन्ही सेट फलंदाजांना एकाच षटकात बाद केले. क्विंटनने ४१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह ५९ धावांवर, तर रिकल्टन २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर बाद झाला.

डेव्हॉल्ड ब्रेव्हिस (२३), मार्को यान्सने (१६) व डेव्हिड मिलर (२०) यांच्या योगदानाच्या जोरावर आफ्रिका ६ बाद १८७धावांपर्यंत पोहोचले. अझमतुल्लाह ओमारझाईने ३, तर राशिदने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ५२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या. सलामीवीर रममनुल्लाह गुरबाझ मैदानावर उभा राहिला आणि त्याने ४२ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची दमदार खेळी केली. अझमतुल्लाह (२२) व राशिद (२०) यांनी चांगले योगदान दिले.

शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा हव्या असताना कागिसो रबाडाने नो बॉल व व्हाईड बॉल फेकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नूर अहमदने षटकार खेचून सामना ४ चेंडूंत ५ धावा असा जवळ आणला. चौथ्या चेंडूवर नो बॉल पडला अन् दोन धावा मिळाल्या. २ चेंडू ३ धावा असा सामना जवळ आला. चौथ्या चेंडूवर दुसरी धाव घेताना फझलहक फारूकी रन आऊट झाला आणि १८७ धावांवर अफगाणिस्तान संघ सर्वबाद झाला.

सुपर ओव्हर काय घडले?

अझमतुल्ला ओमारझाईने पहिल्या दोन चेंडूवर ४ व ६ खेचला. पुढील दोन चेंडूंवर एकेक धाव आली. त्यानंतर चौकार व एक धाव घेताना अफगाणिस्तानने १७ धावा फलकावर चढवल्या. आफ्रिकेला ६ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या. डेव्हिड मिलर आणि डेव्हॉल्ड ब्रेव्हिस ही जोडी मैदानावर आली. मिलरने पहिला फुलटॉस चेंडू मिस केला आणि एक धाव मिळाली. ब्रेव्हिसने दुसरा चेंडू पुल शॉटवर सीमापार पाठवला. तिसऱ्या चेंडूवर फझलहक फारूकी स्लोव्हर बाऊन्सर फेकला अन् ब्रेव्हिस पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर आफ्रिकेला ३ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या. त्रिस्तान स्तब्सने चौकार खेचला, परंतु पुढचा चेंडू निर्धाव राहिला. १ चेंडू ७ धावा असा सामना आलेला असताना स्तब्सने षटकार खेचला आणि सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.

दुसरी सुपर ओव्हर

अझमतुल्लाह ओमारझाईचा पहिलाच चेंडू त्रिस्तान स्तब्सने षटकार खेचला, नंतर एक धाव काढून डेव्हिड मिलरला स्ट्राईक दिली. मिलरने तिसऱ्या चेंडूवर चतुराईने दोन धावा काढल्या. त्यानंतर मिलरने सलग दोन षटकार हाणले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत आफ्रिकने २४ धावांचे लक्ष्य ठेवले. मिरलने ४ चेंडूंत १६ धावा, तर स्तब्सने २ चेंडूंत ७ धावा केल्या. तर कर्णधार एडन मार्करमने चेंडू केशव महाराजच्या हाती दिला. हा मोठा जुगार होता, परंतु महाराजने दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद नबीला झेलबाद केले. त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. ४ चेंडूं २४ धावा अफगाणिस्तानला हव्या होत्या. रहमनुल्लाह गुरबाजने सलग तीन चेंडू सीमापार पाठवून अफगाणिस्तानला सामन्यात ठेवले होते. महाराजने शेवटचा चेंडू व्हाईड टाकून आणखी एका सुपर ओव्हरची संधी निर्माण केली होती, परंतु सहाव्या चेंडूवर विकेट घेऊन अफगाणिस्तानने बाजी मारली.

Comments
Add Comment