Wednesday, February 11, 2026

रूस्तमजीकडून मुंबईतील ऐतिहासिक वाडिया क्लॉक टॉवरचे नूतनीकरण

रूस्तमजीकडून मुंबईतील ऐतिहासिक वाडिया क्लॉक टॉवरचे नूतनीकरण

मुंबई : रूस्तमजी ग्रुप या मुंबईतील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकाने फोर्ट परिसरातील ऐतिहासिक 'बोमनजी होरमरजी वाडिया क्लॉक टॉवर'चे नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. १९व्या शतकातील ही प्रतिष्ठित वास्तू बाजार गेट स्ट्रीट आणि पेरिन नरिमन स्ट्रीटच्या चौकात दिमाखात उभी आहे. हा प्रकल्प काला घोडा असोसिएशनच्या सहकार्याने राबवण्यात आला. १८८२ मध्ये परोपकारी बोमनजी होरमरजी वाडिया यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या ऐतिहासिक कारंजा आणि घड्याळ टॉवरचे नुतनीकरण एका विशेष उद्घाटन कार्यक्रमासह पूर्ण झाले. या कार्यक्रमाला वारसा तज्ज्ञ आणि समुदाय सदस्य उपस्थित होते.

रूस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बोमन रुस्तम इराणी म्हणाले, “मुंबईचा वारसा मला नेहमीच भावतो, कारण तो शहराच्या भावाचे आणि आपण कोण आहोत हे घडवणाऱ्या कथांचे प्रतिबिंब आहे. वाडिया क्लॉक टॉवर हा केवळ भूतकाळातील एक अवशेष नाही; तो रोजच्या मुंबईचा जिवंत भाग आहे आणि तेथून जाणाऱ्या प्रत्येकासाठी खास आहे. या ऐतिहासिक वास्तूला समाजात जे अभिमान आणि सन्मानाचे स्थान होते, ते पुन्हा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

रूस्तमजीमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की आपण घरे उभारतो, तेव्हा आपल्या कुटुंबांचे भवितव्य घडवतो, आणि आपण वारसा जतन करतो, तेव्हा शहर आणि लोकांमधील नाते अधिक घट्ट करतो. शिक्षण आणि सार्वजनिक कल्याणासाठी आयुष्यभर समर्पित व दूरदृष्टी असलेल्या परोपकारी बोमनजी होरमरजी वाडिया यांच्या सन्मानार्थ उभारलेल्या या स्मारकाचे नूतनीकरण करणे हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. वाडिया क्लॉक टॉवरचे नूतनीकरण करताना आम्ही त्यांच्या वारशाचा सन्मान करतो, तसेच यासह नागरी अभिमान जपण्याची आणि शिक्षणाच्या माध्यमातून शहराच्या भविष्यात गुंतवणूक करण्याची आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.''

रूस्तमजी ग्रुपचे हे तत्त्वज्ञान केवळ वारशापुरते मर्यादित नाही. ते शिक्षण आणि नागरी कल्याणाच्या क्षेत्रातील वाडिया यांच्या वारशाचा सन्मान करते आणि त्याच मूल्यांप्रती रूस्तमजीची स्वतःची बांधिलकी दर्शवते. रूस्तमजीसाठी शिक्षण हे समावेशक विकासाचे भक्कम अधिष्ठान मानले जाते. गेल्या तीन वर्षांत, एकूण १४ कोटी रूपयांच्या सीएसआर गुंतवणुकीतून ६.३२ कोटी रूपये शिक्षणासाठी खर्च करण्यात आले आहेत, याचा महाराष्ट्रातील जवळपास ७५० विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. रूस्तमजी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्यांच्या टाउनशिप्समध्ये के-१२ शाळांचा समावेश करून शिक्षणाला समुदायांचा अविभाज्य भाग बनवण्यात आले आहे. याकडे उचललेले पाऊल म्हणून नाही तर भविष्यासाठीची जबाबदारी म्हणून पाहिले जाते.

काला घोडा असोसिएशनच्या अध्यक्षा ब्रिंदा मिलर म्हणाल्या, “वाडिया क्लॉक टॉवरचे नूतनीकरण हे मुंबईच्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी करण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. रूस्तमजीसोबत भागीदारी केल्यामुळे या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा जीवन मिळाले आहे, तसेच पुढील अनेक पिढ्यांसाठी फोर्ट परिसराची सांस्कृतिक समृद्धी अधिक वाढली आहे.”

या सर्वंकष नूतनीकरणात बेसाल्ट दगडी संरचनेचे मजबूतीकरण, स्थापत्य घटकांची दुरुस्ती, पृष्ठभागांची स्वच्छता, घड्याळाचे नूतनीकरण आणि रात्रीची खास प्रकाशयोजना यांचा समावेश होता. मुंबईत प्लेग आणि कॉलरा यांसारख्या साथींचा प्रादुर्भाव असलेल्या काळात उभारण्यात आलेल्या या कारंज्याने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम केले आणि मर्यादित पाइपलाइन पुरवठ्याच्या काळात रस्त्यांची स्वच्छता सुधारण्यास मदत केली. या टॉवरमध्ये लोक, घोडे आणि कुत्र्यांसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी होती, तसेच वैयक्तिक घड्याळे क्वचितच असताना सार्वजनिक वेळ दर्शवण्यासाठी चार घड्याळे बसवण्यात आली होती. आज ही वास्तू प्रकाशमान आणि कार्यक्षम स्मारक म्हणून उभी असून विविधतेने नटलेल्या फोर्ट परिसरात समुदायाचा अभिमान वाढवते.

संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी म्हणाले, “हा प्रकल्प अत्यंत बारकाईने केलेल्या वारसा संवर्धनाचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये संरचनेचे मजबूतीकरण करण्यात आले आहे. घड्याळाच्या यंत्रणेसह मूळ कारागिरीला पुनर्जीवित करण्यात आले आहे, ज्यामुळे हा टॉवर मुंबईच्या स्थापत्य इतिहासाचा साक्षीदार म्हणून दिमाखात उभा राहील."

उद्घाटनप्रसंगी पारशी परंपरेनुसार दिवा प्रज्वलन समारंभाचे आयोजन करण्यात आले. या स्मारकाशी संबंधित पारशी वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि त्याच्या नूतनीकरणाचा आनंद जनतेसोबत साजरा करण्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून आधुनिक शहरनिर्मिती आणि सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख जपण्याचा समतोल साधण्याची रूस्तमजीची बांधिलकी अधोरेखित झाली. बोमनजी होरमरजी वाडिया क्लॉक टॉवरच्या नूतनीकरणासह शहर उभारणी म्हणजे केवळ भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करणे नाही, तर आठवणी, अर्थ आणि सामायिक नागरी ओळख जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हा विश्वास रूस्तमजीने पुन्हा अधोरेखित केला आहे.

मुंबई जसजशी विकसित होत आहे, तसतशा अशा उपक्रमांमुळे ऐतिहासिक वास्तू केवळ भूतकाळाच्या आठवणी न राहता शहरी जीवनाचा सक्रिय भाग राहतात. नूतनीकरण करण्यात आलेले क्लॉक टॉवर आज सातत्य, समुदाय अभिमान आणि जबाबदारपूर्ण जतन यांचे प्रतीक म्हणून उभा आहे, आणि मुंबईच्या ओळखीला आकार देणाऱ्या वारशाचा सन्मान राखत तिचे भविष्य घडवण्याची रूस्तमजीची बांधिलकी दर्शवतो.

Comments
Add Comment