Wednesday, February 11, 2026

प्रेम, विरह आणि शुद्ध भावनांचा संगम! ‘दो दीवाने शहर में’मधील नवे गाणे ‘वजह बेवजह’ प्रदर्शित

प्रेम, विरह आणि शुद्ध भावनांचा संगम! ‘दो दीवाने शहर में’मधील नवे गाणे ‘वजह बेवजह’ प्रदर्शित

मुंबई :  झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्स यांच्या आगामी ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटाने आपल्या वेगळ्या आणि ताज्या प्रेमकथेमुळे प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांना एका अनोख्या, भावनिक प्रेमप्रवासाची झलक दाखवतो. ट्रेलरमध्ये दोघांमधील सहजसुंदर केमिस्ट्री आणि कोमल क्षण ठळकपणे दिसून येतात. व्हॅलेंटाईन सीझनसाठी खास ठरणारा हा चित्रपट प्रेमाच्या खऱ्या, गुंतागुंतीच्या पण अत्यंत वास्तव रूपाचा उत्सव साजरा करतो.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना, निर्मात्यांनी आता 'वजह बेवजह’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. हे गाणे कोणाला तरी मिस करण्याची भावना, विरह आणि ओढ अतिशय हळुवारपणे मांडते. मृणाल आणि सिद्धांत यांच्या व्यक्तिरेखांमधील भावनिक दृश्ये आणि जुन्या आठवणींमधून प्रेम, सहवास आणि त्याची गोड-हळवी वेदना प्रभावीपणे उलगडते. दोघांची भावपूर्ण केमिस्ट्री आणि मधुर संगीत चित्रपटातील प्रेम, भावना आणि नात्यांच्या गुंतागुंतीला सुंदर पूरक ठरते.

भावनांनी भरलेले आणि मनाला भिडणारे हे गाणे श्रेयस पुराणिक यांच्या संगीताने सजले असून, कुमार यांच्या अर्थपूर्ण गीतांनी त्याला आणखी खोली मिळाली आहे. गायक विशाल मिश्रा यांच्या soulful आवाजामुळे हे गाणे अधिकच हृदयस्पर्शी झाले आहे. प्रेमाच्या ऋतूसाठी हे गाणे एक परिपूर्ण आणि मनाला शांत करणारी अनुभूती देते.

झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘दो दीवाने शहर में’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उद्यवार यांनी केले आहे. संजय लीला भन्साळी, प्रेरणा सिंग, उमेश कुमार बन्सल आणि भरत कुमार रंगा यांनी, रवी उद्यवार फिल्म्स यांच्या सहयोगाने, या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा