अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील अमेरिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा ३२ धावांनी विजय झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणे अमेरिकेला भोवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने २० षटकांत नऊ बाद १९० धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या अमेरिकेला २० षटकांत ८ बाद १५८ धावा एवढीच मजल मारता आली. पाकिस्तानकडून ४१ चेंडूत पाच षटकार आणि सहा चौकार मारत ७३ धावा करणारा साहिबजादा फरहान सामनावीर झाला.


अमेरिकेकडून अँड्रीस गॉसने १३, शायन जहांगीरने ४९, कर्णधार असलेल्या मोनंक पटेलने ३, मिलिंद कुमारने २९, शुभम रांजणेने ५१, संजय कृष्णमूर्तीने शून्य, हरमीत सिंगने ६, मोहम्मद मोहसीनने शून्य, शॅडली व्हॅन शाल्कविकने नाबाद १, एहसान आदिलने नाबाद १ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून उस्मान तारिकने ३, शादाब खानने २, मोहम्मद नवाजने १, अबरार अहमदने १, शाहीन आफ्रिदीने १ विकेट घेतली.


याआधी पाकिस्तानकडून सईम अयुबने १९, साहिबजादा फरहानने ७३, कर्णधार असलेल्या सलमान आगाने १, स्टार फलंदाज बाबर आझमने ४६, मोहम्मद नवाजने ५, शादाब खानने ३०, फहीम अशरफने १, उस्मान खानने शून्य (धावचीत), शाहीन आफ्रिदीने नाबाद ९, अबरार अहमदने शून्य धावांचे योगदान दिले. अमेरिकेच्या शॅडली व्हॅन शाल्कविकने ४ तर मोहम्मद मोहसीन, सौरभ नेत्रावलकर, हरमीत सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल