महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी मुंबईहून गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. याचवेळी प्रवासात वरंधा घाटात एक अपघात झाला.
मतदानासाठी मुंबईहून महाडला गेलेल्या चार जणांनी परत येताना मृत्यूला चुकवलं आहे. मृत्यूला चकवत कारमधून उड्या मारत आपले जीव वाचवले आहेत.
नेमकं घडलं काय ?
भोर - महाड वरंधा घाटात ही घटना घडली. कार महाडवरून भोरच्या दिशेने येत होती. घाटात असलेल्या शिरगावचा हद्दीत एका धोकादायक वळणार येताच चालकाचे नियंत्रण सुटले. आणि कर दरीच्या दिशेने जाऊ लागली.
दरीत कोसळण्याआधी कारमधून बाहेर....
कार दरीच्या दिशेने जात आहे, आपण दरीत कोसळणार हे लक्षात येताच अवघ्या काही क्षणातच चौघांनी कार मधून आभार उडी मारली, आणि त्यांचे जीव थोडक्यात वाचला. चोघे फक्त किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.







