Monday, February 9, 2026

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हा अहवाल सादर केला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकविण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारनं शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केली होती. या समितीकनं राज्यभरात दौरे करत राजकीय नेत्यांसह संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद कार्यक्रम, जनसुनावणी घेतली. त्यानंतर आता समितीनं हा अहवाल सरकारला सादर केला असून लवकरच हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment