कॅनडा विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये कॅनडा विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी निर्णय घेणे कॅनडाला भोवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत चार बाद २१३ धावा केल्या. नंतर २० षटकांत २१४ धावा करण्याच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कॅनडाचा संघ मैदानात उतरला. पण दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी गोलंदाजीपुढे कॅनडाची डाळ शिजली नाही. कॅनडाने २० षटकांत आठ बाद १५६ धावा एवढीच मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा ५७ धावांनी विजय झाला.


दक्षिण आफ्रिकेचा लुंगी न्गिडी हा गोलंदाज सामनावीर झाला. त्याने कॅनडाच्या चार फलंदाजांना बाद केले. लुंगी न्गिडीने कर्णधार असलेल्या दिलप्रीत बाजवा (शून्य धावा), युवराज समरा (१२ धावा), निकोलस किर्टन (चार धावा) आणि हर्ष ठाकर (३३ धावा) या चौघांना बाद केले.


कॅनडाकडून दिलप्रीत बाजवाने शून्य, युवराज समराने १२, नवनीत धालीवालने ६४, निकोलस किर्टनने ४, श्रेयस मोव्वाने ९, हर्ष ठाकरने ३३, साद बिन जफरने ११, जसकरण सिंगने शून्य, दिलोन हेलिगरने नाबाद ४, कलीम सनाने नाबाद ५ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी न्गिडीने चार, मार्को जॅनसेनने दोन तर कॉर्बिन बॉश आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी एक विकेट घेतली.


याआधी दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मर्करामने ३२ चेंडूत १० चौकार आणि एक षटकार मारत ५९ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने त्याला छान साथ देत २२ चेंडूत २५ धावा करताना दोन चौकार मारले. नंतर आलेल्या रायन रिकेलटनने २१ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारत वेगाने ३३ धावा केल्या. डेवॉल्ड ब्रेव्हिसने ६ धावा केल्या. डेव्हिड मिलरने नाबाद ३९ आणि ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. कॅनडाकडून अंश पटेलने ३ तर दीलप्रीत बाजवाने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

आरसीबीला मोठा धक्का; वेगवान गोलंदाज यश दयाल आयपीएल २०२६ मधून बाहेर

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज यश दयाल वैयक्तिक

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आयपीएलच्या 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमावर नाराज

- दिल्ली कॅपिटल्सला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कच्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रतीक्षा आयपीएल २०२६

Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेवर दहशतीचे सावट? परदेशी खेळाडूंना तात्काळ माघार घेण्याचा इशारा

गुरुवार २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) ११ व्या हंगामावर दहशतीचे सावट पसरलेले दिसत

हॉकी इंडियाची ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकने जाहीर

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर केली. २७ मार्च २०२६ रोजी नवी

IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये ‘कॅप्टन्सची लढत’; हार्दिक पंड्याने स्वतःहून कर्णधारपद सोडावे; श्रीकांत यांचा सल्ला

मुंबई इंडियन्स संघाची नजर आयपीएल २०२६ च्या हंगामात सहाव्या विजेतेपदावर आहे. मात्र यंदाचा सीझन खास ठरणार आहे,

IPL 2026 : केकेआरच्या संघात सौरभ दुबेला संधी

तीन वेळचे चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने विदर्भातील उंच डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबेला करारबद्ध केले आहे.